आईची महिमा : हाल भोगून मुलांचे भवितव्य केले उज्ज्वलयवतमाळ : जिजामाता होत्या म्हणूनच शिवराय घडले. जिजामातेचा हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अनेक महिला परिस्थितीशी संघर्ष करीत आहे. कुणी धुणी-भांडी करीत मुलांना मोठे केले. प्रशासनातील वर्ग १ चा अधिकारी बनविले. काहींनी भाजीपाला विकून मुलांना इंग्रजी शिक्षण दिले. तर काहींनी ‘रेड लाईट’ एरियातील मुलांची शिकवणी घेण्याचे काम केले. जिजामातेच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील धाडसी महिलांचा वृतांत...शोभाबाईमुळेच स्वाती बनली अधिकारीमडकोना (ता. मडकोना) येथील धुणी-भांडी करणाऱ्या शोभाबाई यिसाये यांनी पै-पै जोडून आपल्या स्वातीला शिक्षण दिले. रिक्षा चालविणारे वडील शरद यांचाही भक्कम आधार होता. आज त्यांची स्वाती वर्ध्याच्या परिविक्षाधीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्या २०१३ च्या एमपीएसी बॅचमधील अधिकारी आहेत. मेहनत, जिद्द होतीच. पण आई शोभाबार्इंनी वेळोवेळी दिलेली हिंमत मोलाची ठरली. मुलांच्या शिक्षणासाठी भाजीवालीची राष्ट्रपतींकडे धाववाघापुरातील धर्मशिला आनंदराव वाकोडे यांचे अणे महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांच्या पतीची नोकरी गेल्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार धर्मशिलावर आला. या स्थितीत ती डगमगली नाही. तिचे होम सायन्स झाल्याने तिने लोणेचे विकण्याचा निर्णय घेतला. आज ती ४० प्रकारचे लोणचे सायकलवर घरपोच विकण्याचे काम करते. सोबतच भाजीपाला विक्रीही करते. धर्मशिलाची दोन्ही मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहेत. वार्षिक फी भरता न आल्याने शाळेने मुुलांना काढून टाकले. यानंतर तिने १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत न्याय न मिळाल्याने तिने यासंदर्भात राष्ट्रपतींकडे तक्रार दाखल केली आहे. ‘वारांगणां’च्या मुलांसाठी माधुरीचा संघर्ष लोहारा परिसरात वास्तव्याला असणाऱ्या आणि सध्या कृषी विभागात शिपाई असणाऱ्या माधुुरी नरेंद्र खिरकर यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. या भागात वारांगणा वस्ती होती. या वस्तीमधील मुलांना शिकविण्याकरिता राजीव गांधी संधीशाळा त्यांनी चार वर्ष चालवली. काही मुलींना या व्यवसायातून त्यांनी बाहेर काढले. २००८ मध्ये या वस्तीला आग लागली. मुले आणि वारांगणा हद्दपार झाल्या. मात्र माधुरीचा शिक्षणाचा वसा सुरूच होेता. यानंतर त्यांनी कारागृहातील बंदिस्त भगिनींच्या मुुलांना शिकविण्याचे काम केले. कारागृहातील कैदी महिलांनाही शिवणकलेचे धडे दिले. बचतगट तयार करण्याचे काम त्या करताहेत. पारधी वस्तीमधील मुलांना शिकविण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. निरक्षर सीताबाईचे गणित संगणकापेक्षा पक्केआंबेडकर नगरातील सीताबाई विठोबा पाणबुडे या निरक्षर आहेत. मात्र त्यांचे गणित शिक्षितांनाही मागे टाकणारे आहे. फळभाज्यांचा त्यांचा व्यवसाय आहे. व्यवहारात त्यांचा हिशेब कधीच चुकत नाही. दररोज फळे खरेदी करून विकणे आणि कुटुंबाचा गाडा चालवणे हा त्यांचा संघर्ष नित्याचाच. वयाची साठी पार केली. पण चपळता कायम आहे. त्यांचे काम घरासाठी आधारवडठरणारे आहे.
प्रतिकूल परिस्थितीला वाकविणाऱ्या आधुनिक ‘जिजाऊ’
By admin | Published: January 12, 2016 2:23 AM