लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील सिंगद येथील आधुनिक आणि उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली. त्यांनी तेथील पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे उदघाटनही केले.यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक राहुङकर यांनी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली. त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने रूट टेनरचा उपयोग करून एकाचवेळी कमी खर्चात व लवकर रोपे तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवङीकरिता चांगली व दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कामी लागली आहे. सिंगद येथील रोपवाटिकेत निर्मित गांङूळखत, गोमुख नेत्र याची मुख्य वनसंरक्षकांनी पाहणी केली.या रोपवाटिकेत ५० मोठी उंच १८ महिन्यांची रोपे व १० हजार लहान रोपे सया तयार झली आहे. त्यात साग, मोह, बिबा, करंज, शिशु, बांबू , हिरडा, बिहाङा, चंदन आदी २८ प्रजातींच्या रोपांचा समावेश आहे. या रोपांची निर्मिती व वाढ याबाबत मुख्य वनसंरक्षकांनी माहिती घेतली. यावेळी उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या पॉली हाऊस व ग्रीन हाऊसचे त्यांनी उदघाटन केले. या रोपवाटिकेवर वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद धोत्रे देखरेख करीत आहेत.
सिंगदच्या आधुनिक रोपवाटिकेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:24 PM