शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

विदर्भात सहा महिन्यांत २० हजार झाडांची कत्तल; वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 12:52 PM

विदर्भात १ जानेवारी ते ३० जून २०२१ या कालावधीत सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देतीन कोटी रुपयांचे नुकसान : सहा हजार सागवान वृक्षांवर कुऱ्हाड

विलास गावंडे

यवतमाळ : वृक्ष लागवडीच्या अनेक योजना राबविल्या जात असतानाच, दुसरीकडे बेसुमार अवैध वृक्षतोड केली जात आहे. विदर्भात मागील सहा महिन्यांत (१ जानेवारी ते ३० जून २०२१) सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. या प्रकारात २ कोटी ९४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सहा वनवृत्तामध्ये येणाऱ्या २० वनविभागात झालेल्या अवैध वृक्षतोडीने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

अवैध वृक्षतोडीमध्ये सागवान वृक्षाला लक्ष्य करण्यात आले आहे. सहा महिन्यांत सहा हजार २३७ सागवानाच्या झाडांवर आरा चालविण्यात आला आहे. त्यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ वनवृत्तामध्ये झालेली वृक्षतोड पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे.

नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळविली आहे. सर्वाधिक सागवान व इतर प्रकारच्या वृक्षांची अवैध तोड गडचिरोली वनवृत्तात झाली आहे. या क्षेत्रात सात हजार २१६ झाडे तोडण्यात आल्याने ८७ लाख ८४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याखालोखाल नागपूर वनवृत्तात अवैध वृक्षतोड झाली. पाच हजार ६१ झाडे तोडून २८ लाख ५० हजार रुपयांचा दणका या वनवृत्ताला बसला आहे.

चंद्रपूर वनवृत्तातील दोन हजार ९१५ झाडे अवैधरित्या कापण्यात आली. त्यामुळे १७ लाख ३० हजार रुपये नुकसानीची झळ या वनवृत्ताला पोहोचली आहे. अमरावती वनवृत्तातील दोन हजार ९४२ झाडे तोडण्यात आल्यामुळे ५२ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ वनवृत्तात दोन हजार ५७८ झाडांवर कुऱ्हाड चालविली गेली. १४ लाख ७८ हजार रुपयांच्या नुकसानीला हे वनवृत्त बळी ठरले आहे. या प्रत्येक वनवृत्तामध्ये सागवान वृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणात झाली आहे.

सिरोंचात सर्वाधिक झाडे तोडलीगडचिरोली वनवृत्तात येणाऱ्या सिराेंचा वनविभागात तीन हजार ४८ झाडे अवैधरित्या कापण्यात आली आहेत. तब्बल ६५ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान या विभागाला झाले. विदर्भात सर्वाधिक वृक्षतोड याठिकाणी झाली आहे.

यवतमाळात सागवानावर हातयवतमाळ वनवृत्तातील पुसद वनविभागाचा वृक्षतोडीचा आकडा मोठा आहे. याठिकाणी सागवान आणि इतरप्रकारची १०४४ झाडे अवैधरित्या तोडण्यात आली. सहा लाख ९७ हजार रुपयांचा दणका या विभागाला बसला आहे. त्याखालोखाल यवतमाळ (५७४), वाशिम (९८), पांढरकवडा (४६२) विभागात वृक्षतोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यवतमाळ वनविभागातील ५७४ वृक्षतोडीमध्ये ५१६ झाडे सागवानाची आहेत. पुसदमध्येही ९६६ सागवान वृक्ष कापण्यात आले.

वनवृत्तातील वृक्षतोड, नुकसान (लाखात)वनवृत्त - तोडलेली झाडे - नुकसान

चंद्रपूर - २९१५ - १७.३०गडचिरोली - ७२१६ - ८७.८४

नागपूर - ५०६१ - २८.५०अमरावती - २९४२ - ५२.५२

यवतमाळ - २५७८ - १४.७८

टॅग्स :environmentपर्यावरणCrime Newsगुन्हेगारी