‘मोअर’ या..! यंदा भर पावसाळ्यात प्रचंड उकाड्याने नागरिकांना बेजार केले होते. पण गणरायाच्या आगमनासोबत गुरुवारी जोरदार पाऊसही आला. वाजत-गाजत आणि भिजत गणेशाला घरी नेणाऱ्या भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा गजर तर केलाच; पण पावसालाही ‘मोअर या’ म्हणायला नागरिक विसरले नाहीत!