आमदार विकास निधी : वर्षभरात सूचविली ७९० कामे यवतमाळ : निवडणुकांच्या तोंंडावर आमदारांनी विकास कामांचा धडाका लावला असून मतदारांना खूश करण्यासाठी सर्वाधिक निधी सभागृहांसाठी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील नऊ आमदारांनी २४ कोटींचा खर्च केला असून त्यात रस्ता, पाणी, अॅम्बुलन्स, वाचनालय आदींचा समावेश आहे. वर्षभरात ७९० कामे करण्यात आली असून आमदार महोदयांनी त्याचे भूमिपूजनही केले आहे. आमदार विकास निधीच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी भरीव निधी दिला जातो. शासनाचा हा निधी आमदार मतदार आणि निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन पद्धतशीरपणे खर्च करतात. निवडणुकीच्या वर्षात तर हा निधी तल्लक बुद्धीने वापरला जातो. शासनाचा निधी आणि आपल्या नावाचा डांगोरा असा हा प्रकार असतो. सभागृह आणि सांंस्कृतिक भवनाची सर्वाधिक मागणी असते. आमदार आपल्या मतदारांना नाराज करत नाही. त्यासाठी जिल्ह्यातील नऊही आमदारांनी सर्वाधिक निधी सभागृह आणि सांस्कृतिक भवनासाठी दिला आहे. यासोबतच सिमेंट रस्ते, डांबरीकरण आदींसाठी निधी दिला आहे.
आमदारांचा सर्वाधिक निधी सभागृहांसाठी
By admin | Published: July 25, 2014 12:03 AM