शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

५५० शिक्षकांवर कारवाईचे गंडांतर

By admin | Published: August 11, 2016 1:03 AM

जिल्हा परिषदेच्या ५५० शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. तथापि संबंधित विभाग उदासीन असल्याने त्यांच्यावर कठोर

जात पडताळणी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग उदासीन यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ५५० शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. तथापि संबंधित विभाग उदासीन असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता लांबणीवर पडत आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण विभाग सर्वात मोठा विभाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा परिषदेच्या शाळांवर तब्बल आठ हजार १0१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात सात हजार ५00 शिक्षक कार्यरत आहे. यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या प्रवर्गातून नियुक्त करण्यात आलेले अनेक शिक्षक आहेत. काहींनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले आहे. मात्र तब्बल ५५0 शिक्षकांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. त्या सूचनांना या बहाद्दर शिक्षकांनी चक्क केराची टोपली दाखविली. अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच यवतमाळ जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यांच्यासमोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातील अनेक बाबी स्पष्ट केल्या. त्यांनी आपली हतबलताही व्यक्त केली. त्याचवेळी जात पडताळणी प्रकरणाची त्यांनी गंभीर दखल घेतली. जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या त्या शिक्षकांना तातडीने प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यामुळे आता या शिक्षकांवर गंडांतर येण्याची शक्यता बळावली आहे. आता शिक्षण विभाग संबंधित शिक्षकांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस बजावणार आहे. (शहर प्रतिनिधी)