दिग्रस : लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. दिग्रस पंचायत समितीसमोरही कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. जिल्हा परिषदमधील लिपिकांच्या वेतन त्रुटी व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने वेळोवेळी निवेदने दिली. मात्र शासनाने दखल न घेतल्यामुळे १६ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत लेखणीबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. दिग्रस शाखेतर्फे गटविकास अधिकारी पी.आर. राठोड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्यामसुंदर गुल्हाने यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या आंदोलनात एस.के. गुल्हाने, डी.एन. निमकर, एम.एन. खान, नलिनी घाटगे, व्ही.ए. उमरे, एच.आर. घाटोळे, आरती गादेकर, वृषाली कथळकर, शीला घुले, व्ही.के. राठोड, एन.डब्ल्यू. चांदेकर, गजानन डहाके आदी लिपिकवर्गीय कर्मचारी सहभागी झाले आहे. ग्रेड-पे सुधारणा करणे, प्रशासकीय बदल्यांचे अन्यायकारक धोरण रद्द करणे, जॉबकार्ड निश्चित करणे, पाल्यांना नि:शुल्क शिक्षणाची सवलत देणे आदी १५ मागण्या संघटनेने केल्या आहे. (प्रतिनिधी)
दिग्रस येथे लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: July 17, 2016 12:47 AM