शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

वेतनासाठी ‘वसंत’च्या कामगारांचे आंदोलन

By admin | Published: April 11, 2016 2:42 AM

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतन तब्बल १६ महिन्यांपासून थकीत असून संतप्त झालेल्या कामगारांनी रविवारी आंदोलनाचे शस्त्र उपसले.

साखरेचे ट्रक अडविले : १६ महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतन तब्बल १६ महिन्यांपासून थकीत असून संतप्त झालेल्या कामगारांनी रविवारी आंदोलनाचे शस्त्र उपसले. कारखान्यातून बाहेर जाणारे साखरेचे ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला. त्यावेळी प्रशासन आणि कामगारांत तणाव निर्माण झाला होता.वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईस आला आहे. यंदा तर केवळ १३ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले. कारखान्याच्या इतिहासात एवढे कमी गाळप झाले. गत १६ महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार आंदोलने करूनही या कामगारांना वेतन दिले जात नाही. वेतनासाठी कामगार संघटनेचे नेते पी.के. मुडे आणि व्ही.एम. पतंगराव यांच्या मार्गदर्शनात कामगारांनी कारखान्यापुढे ठिय्या दिला. कारखान्यातून साखर घेऊन जाणारे ट्रक अडविले. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत कारखान्यातून साखर बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. दरम्यान, कारखान्यातून साखर घेऊन जाणारे अनेक ट्रक अडकले आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतला नव्हता. सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीतवसंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घोषित झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकही निवडणुकीत व्यस्त दिसत आहे. कामगारांची बाजू घेण्यासाठी आता कुणीही नाही. जो तो आरोप-प्रत्यारोप करीत आहे. कारखाना आर्थिक डबघाईस असताना आणि कामगार आंदोलन करीत असताना कुणीही त्यांची बाजू मांडताना दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)