लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागल्यास कंत्राटी ग्रामसेवक उमेदवारांचे नियुक्ती आदेश लांबणीवर पडू शकतात. यामुळे ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी दोन दिवस जिल्हा परिषदेत पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर लवकरच नियुक्ती आदेश देण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत २०२३-२४ या वर्षात झालेल्या सरळसेवा पदभरतीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालानुसार तात्पुरती ५२ पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत ज्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी सरळसेवा परीक्षेचा अर्ज भरताना ज्या कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर केला आहे. त्या सर्व मूळ कागदपत्र व त्या कागदपत्रांच्या दोन छायांकित प्रतीसह ३० सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात उपस्थित राहावे लागणार आहे. ५२ जागांसाठी निवड व प्रतीक्षा यादीतील १९८ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमुळे नियुक्ती आदेश देण्यासाठी आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा अशी वेळ येऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे. कागदपत्रांच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश मिळेल.
पेसा क्षेत्रातील १०९ पदेकंत्राटी ग्रामसेवकांची २०९ पर्द पैसा क्षेत्रातील आहेत व चिंगर पैसा क्षेत्रात ५२ पढे आहेत, पेसा क्षेत्रातील व बिगर पेसा क्षेत्रातील एकूण १६२ पदे आहेत. मात्र, पैसा क्षेत्रातील पदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासनाकडून प्राप्त निर्देशानंतर भरण्यात येणार आहे. सध्या केवळ ५२ पदांची निवड व प्रतीक्षा यादीनुसार प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारांना प्रत्यक्ष आदेशाची प्रतीक्षाजिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवकाना नियुक्ती आदेश देण्यासाठी प्रशासन कामी लागले आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष नियुवती आदेश कधी मिळेल याची प्रतीक्षा व उत्सुकता आहे.