शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

शिळोणाची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल

By admin | Published: March 31, 2017 2:30 AM

स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत पुसद पंचायत समितीने हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

गावकऱ्यांचे सहकार्य : पुसद पंचायत समितीचा पुढाकार पुसद : स्वच्छतेतून समृद्धीचा मंत्र देत पुसद पंचायत समितीने हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. या मोहीमेला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत असून, चार हजार लोकसंख्येचे शिळोणा गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. गावात नागरिकांनी शौचालय बांधले असून, त्याचा वापरही केल्या जात आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत पुसद पंचायत समिती क्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेतले. या गावात ही मंडळी जाऊन जनजागृती करीत आहेत. पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर.व्ही. पुजारी यांनी शिळोणा गाव दत्तक घेतले. सुरूवातीला या गावात बोटावर मोजता येईल एवढीच शौचालये होती. मात्र गाव दत्तक घेतल्यानंतर गटविकास अधिकारी समाधान वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी. मनवर, बालविकास प्रकल्प अधिकारी सीमा बांदे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात आली. गावाचे सरपंच गजानन पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तोंडबाराव चिरंगे, पोलीस पाटील हरिभाऊ चिरंगे, मुख्याध्यापक नरसिंग चव्हाण, ग्रामविकास अधिकारी काळबांडे, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी हागणदारीमुक्तीसाठी पुढाकार घेतला. आता या गावात शौचालय बांधण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढे येत आहे. सुरूवातीला अर.व्ही. पुजारी यांनी शालेय मुलांना हागणदारीबाबत मार्गदर्शन केले. आपल्या पालकांना शौचालय बांधण्याचा आग्रह करण्यास सांगितले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन आतापर्यंत ६२ शौचालय बांधण्यात आली. ९० शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या गावातील प्रत्येक घरी शौचालय बांधून हागणदरीमुक्त गावाचा मानस पुजारी यांनी व्यक्त केला. (कार्यालय चमू)