लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील विविध भागात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे काही ठिकाणी अपघात होताहेत, तर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळेच नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम हाती घेतली आहे. ११ जून ते १३ जून या कालावधीत शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढले जाणार आहे. गुरुवारी तायडेनगर परिसरातील अतिक्रमण जमिनदोस्त झाले.तायडेनगर परिसरात अनेकांनी नागपूर रोडवर फुटपाथवर दुकाने थाटली. स्पेअरपार्ट विक्रीची, वाहने दुरुस्तीची दुकाने अवैधरित्या थाटली होती. या दुकानांमुळे मोठमोठी वाहने रस्त्यावरच उभी ठेऊन त्याची दुरुस्ती केली जात होती. पालिकेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या आदेशावरून अतिक्रमण प्रमुख राहुल पळसकर, लता गोंधळे, अशोक मिसाळ, सुरेंद्र गोंधळे, देवानंद ठवकर, निरज सहारे, अतुल चिल्लरवार यांच्यासह शहर ठाणेदार धनंजय सायरे, सहायक पोलीस निरिक्षक अंभोरे, जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख अनिल किनगे, चार्ली पथकाचा बंदोबस्त लाऊन हे अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण मोहिमेला कडाडून विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवत रस्त्यावरील अतिक्रमण काढत नागपूर मार्ग मोकळा केला. आता पुढील टप्प्यात पोस्टल ग्राऊंड, दारव्हा रोड, पांढरकवडा रोड, आर्णी रोड, धामणगाव रोड येथील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
तायडेनगरात पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 5:00 AM
तायडेनगर परिसरात अनेकांनी नागपूर रोडवर फुटपाथवर दुकाने थाटली. स्पेअरपार्ट विक्रीची, वाहने दुरुस्तीची दुकाने अवैधरित्या थाटली होती. या दुकानांमुळे मोठमोठी वाहने रस्त्यावरच उभी ठेऊन त्याची दुरुस्ती केली जात होती. पा
ठळक मुद्देतीन दिवस चालणार मोहीम : रस्त्याच्या जागेवरील अवैध बांधकाम