लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : बेंगलोर येथील निर्भीड पत्रकार तथा समाजसेविका गौरी लंकेश यांच्या हत्येचा येथील मुस्लिम महिला संघटनेच्या महिला विभाग जमाते इस्लामी हिंद व गर्ल्स इस्लामीक आॅर्गनायझेशन आॅफइंडीयाने (जीआयवो) जाहीर निषेध केला आहे.या संघटनांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले. त्यातून गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे निवेदनात नमूद करून सध्या निर्भीड पत्रकार आणि बुद्धिजीवी वर्गावर, तसेच स्वतंत्र विचारधारा असणाºया समाजसेवकांवर होणाºया हल्यांबाबत निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली. शासनाने अशा घटनांवर निर्बंध घालण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे .नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे , कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रसिद्धी माध्यमांची स्वतंत्रता आणि देशातील स्वतंत्रता, अभिव्यक्ती व लोकशाही शासन आणि कायद्याची हत्या असल्याचे नमूद करून हा देशासाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे. अपराध्यांना त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणीही करण्यात आली. निवेदन देताना जमातच्या महिला विभागाच्या अध्यक्ष हुमेरा काझी, आरेफा मोमीनाती, अस्मा ईबाद, जीआयवोच्या अध्यक्ष सुमय्या तबस्सुम, अफसाना परवीन, नाझमीन आफरीनसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुस्लीम महिला संघटनांतर्फे गौरी लंकेशच्या हत्येचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 9:22 PM