लोकमत न्यूज नेटवर्कनेर : मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आवश्यकता दुर्लक्षित करण्यात आल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली.जामा मशीद येथे नमाज अदा करून नेताजी चौकातून मोर्चा काढण्यात आला. अमरावती रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. जमियत उलेमा हिंद नेरच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तहसील परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याठिकाणी मौलवी मौलाना रिजवान उल्लाह खाँ, अॅड. लतिफ मिर्झा, जफर एन. खान, गुलाब खाँ, इम्तियाज सेठ, मुसा टिक्की, मौलवी उबेद, बासिद खान आदींनी उपस्थितांना संबोधित केले.मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अधोगती होत आहे. अत्यंत केविलवाणी अवस्था या समाजाची झाली आहे. न्या. राजेंद्र सच्चर कमिटी, न्या. रंगनाथ मिश्रा तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने नियुक्त मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने आपल्या अहवालात मुस्लीम समाजाला आरक्षणाची आवश्यकता नमूद केली आहे. मात्र शासन मुस्लीम आरक्षणाबाबत वंचित आहे. मुस्लीम समाजाला त्यांचे न्याय व हक्क त्वरित मिळावे यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. योवळी मौलाना रिजवान उल्लाह खाँ, मिर्झा लतिफ, जफर एन. खान, गुलाब खाँ, नगरसेवक तनवीर खाँ, मुसा टिक्की, मौलवी उबेद, बासीद खान, मौलवी खालिद, शरद मोरे, वंदना मिसळे, मोहीन पटेल, अत्तेहर उलहक, शाहबाज खाँ, शोहेब खाँ, मौलवी रहेमतुल्ला, मोहम्मद अली साहब, अब्दुल्ला शेख, राजीकभाई, जफरूल्ला खाँ आदी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल पोवार यांना निवेदन देण्यात आले. ठाणेदार अनिल किनगे, सहायक पोलीस निरीक्षक पुंडगे, राजू कुकडे, राजेश चौधरी, राजेश भगत, जीवन राठोड, नितीन कडुकार, महेश तडसे, मोहन कसबे, कासम निमसुलवार, प्रदीप खडके, गुणवंत पाटील आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मुस्लीम आरक्षणासाठी धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 10:18 PM
मुस्लीम समाजाला आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शुक्रवारी समाजबांधवांनी येथे मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर केले. यामध्ये समाजबांधवांचा लक्षणीय सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या मोहम्मद रहेमान अभ्यास गटाने सांगितलेली आरक्षणाची आवश्यकता दुर्लक्षित करण्यात आल्याची बाब यावेळी प्रामुख्याने मांडण्यात आली.
ठळक मुद्देनेरमध्ये मोर्चा : मो. रहेमान अभ्यास गटाचा अहवाल दुर्लक्षित असल्याचा आरोप