नॅक पिअर टीमचे अध्यक्ष भुवनेश्वर येथील डॉ. कमल मिश्रा, समन्वयक रायपूरचे डॉ. अरुण कुमार, सदस्य कलबुर्गीचे डॉ. सनबसनगौडा डोलैगुहार उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रम, निकाल, सोईसुविधा, खेळ साहित्य, मैदाने, अध्ययन पद्धती, राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे राबविलेले विविध उपक्रम, ग्रंथालय सुविधा, प्रवेश पद्धती, सर्व ऑडिट, मूल्यशिक्षण, महाविद्यालय परिसर, बेस्ट प्रॅक्टिस, परिसरातील स्वच्छता, अभ्यासक्रमपूरक उपक्रम, मूल्यांकन पद्धती, फर्निचर, संगणक व्यवस्था, गृह अर्थशास्त्र विभागाद्वारे चालविणारे नावीन्यपूर्ण उपक्रम आदींची माहिती घेतली.
महाविद्यालयाचा दैनंदिन व्यवहार, शिक्षक वर्गाचे संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे चालणारी उपक्रमांची पाहणी केली. माजी विद्यार्थी आणि पालक, प्राचार्य, संस्था व्यवस्थापन, शिक्षक व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. ए. पी. जाधव, आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रीती ठाकरे, संस्थेचे राहुल ठाकरे, अशोक ठाकरे, जगन्नाथ बोरकर, प्राचार्य डॉ. फाले, डॉ. रमेश खंडारे, डॉ. रामधन हिरे, डॉ. राजेश गेडाम, प्रा. रूपाली कणसे, प्रा. पुरुषोत्तम बांडे, प्रा. जयवंत जुकरे, नितेश कदम, सचिन माटोळे, सतीश सरतापे, विनोद कंठाळे, मनीष टिचुकले, सोमराज लोहकरे आदींनी सहकार्य केले.