शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

नाव, गाव विचारले; अंगझडती घेताच निघाला देशी कट्टा

By विशाल सोनटक्के | Published: October 12, 2023 6:22 PM

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला डोर्ली रोडवर दोघेजण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली.

यवतमाळ : शहरातील आंबेडकर चौक ते डोर्ली रोड दरम्यान नगरपरिषदेच्या स्वच्छतागृहाशेजारी दोघेजण संशयास्पद स्थितीत फिरताना आढळले. पोलिस पथकाने ताब्यात घेवून त्यांना नाव, गाव विचारले, उडवाउडवीची उत्तरे मिळताच पथकाने त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे देशीकट्टा आढळला. या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला डोर्ली रोडवर दोघेजण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली. या दोघांकडे घातक हत्यारे असल्याचेही समजल्याने पथकाने डोर्ली रोडकडे धाव घेतली. तेथे स्वच्छागृहाजवळ दोघेजण उभे असल्याचे आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता एकाने सिद्धार्थ वासुदेव गायकवाड (३०) रा. सेवानगर यवतमाळ तर दुसऱ्याने लखन उर्फ जानी विजय चंदेल (२८) रा. सेवानगर यवतमाळ असे सांगितले.

दोघांची अंगझडती घेतली असता सिद्धार्थ याच्याकडे देशी बनावटीच्या मॅग्झीनला काळ्या रंगाचे फायबर कव्हर असलेली पिस्टल आढळून आली. तर चंदेल याच्या खिशामध्ये एक जीवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघाविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ व कलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी