लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा निवडणूक विभाग मतदारयादी पुनरिक्षणाचा कार्यक्रम युद्ध पातळीवर राबवित आहे. त्या कामासाठी २५५० बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक आणि अंगणवाडी ताई यांचा समावेश आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून फोटो नसणारी व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसेल, तर स्थानिकांच्या आधारे पंचनामा करून ही नावे वगळली जात आहेत. जिल्ह्यामध्ये सात विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ५७४ नावे वगळली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३३ हजार ४८२ नावे यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील आहे.अनेकवेळा सूचना दिल्यानंतरही मतदारांनी आपले फोटो सादर केले नाहीत. यामुळे ही व्यक्ती अस्तित्वात नसावी, असा अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. ही व्यक्ती मयत झाली असावी, अथवा त्याठिकाणी राहात नसेल, यामुळेच त्यांची छायाचित्रे उपलब्ध झाली नाही, असा निष्कर्ष निघाला आहे.
छायाचित्र जमा करण्यासाठी ८ जुलैची डेडलाईनमतदार यादीमध्ये छायाचित्र जमा करण्यासाठी २५ जूनची डेडलाईन देण्यात आली होती. ही डेडलाईन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली. यानंतरही छायाचित्र न आल्याने आता ८ जुलैपर्यंत याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर मतदार यादीतून छायाचित्र नसलेले मतदार काढले जाणार आहे.
येथे जमा करा छायाचित्र प्रत्येक गावामध्ये बीएलओ मार्फत घरोघरी सर्वेक्षण होत आहे.बीएलओंकडे छायाचित्र नसल्यास मतदार यादीसाठी छायाचित्र देता येतील.बीएलओ येऊन गेले असतील तर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक विभागात छायाचित्र जमा करता येते. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहे.