लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.केंद्र सरकारने देशात ४०-६० चा रेषो ठेऊन नोटाबंदी केली. नोटा बदलून घ्यायच्या असतील तर ६० टक्के तुमचे व ४० टक्के आमचे असे गणित ठरले होते. त्या ४० टक्क्यांमुळेच भाजपजवळ प्रचंड पैसा गोळा झाल्याचा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली हा उद्योग करण्यात आला. मात्र भाजपच्या १८ खासदारांची संपत्ती कोट्यवधीने कशी वाढली, याचे उत्तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.भाजप-शिवसेनेत प्रचंड रुसवे-फुगवे होते. मात्र आता त्यांची युती झाली. या युतीतून शिवसेनेला काहीही मिळाले नाही. त्यामुळे दर तीन महिन्यांनी शिवसेना फुगते असा आरोप त्यांनी केला. आमची सत्ता आली नाही तर विरोधात बसू, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे अभिवचनही त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे दिले. यावेळी मंचावर प्रा. प्रवीण पवार, युसुफ पुंजानी आदी उपस्थित होते.
Lok Sabha Election 2019; नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील सर्वात मोठे डाकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:16 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
Lok Sabha Election 2019; नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील सर्वात मोठे डाकू
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : दिग्रस येथे जाहीर सभेत आरोप