राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५ : मान्यवरांच्या उपस्थितीत सोडत जाहीरयवतमाळ : लोकमत सखी मंचच्यावतीने सुवर्णस्पर्श आयोजित ‘राज्यस्तरीय बक्षीस धमाका २०१५’ योजनेची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित करण्यात आली. या योजनेतील राज्यस्तरीय महाबम्पर बक्षीस १०० ग्रॅम सोन्याचा नेकलेसच्या मानकरी नाशिक येथील चेतना ढोकळे ही भाग्यवंत सखी ठरली.१५ वर्षांपासून ‘लोकमत’ने महिलांसाठी ‘सखी मंच’ नावाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दरवर्षी नित्यनवे उपक्रम राबवून महिलांना ‘चूल आणि मूल’ या रेखीव आणि परंपरागत चौकटीतून मुक्त करण्यासाठी तसेच त्यांना सर्वगुण संपन्न बनविण्यासाठी सखी मंच कार्यरत आहे. यंदाही महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील सुमारे दोन लाख सखींसाठी २५ लाख रुपयांच्या बक्षिसांची योजना राबविण्यात आली होती. त्यात महाबम्पर, तसेच राज्यस्तरीय प्रथम तीन क्रमांकांसाठी सोन्याच्या नेकलेसची बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यासोबतच ‘लोकमत’च्या राज्यभरातील आवृत्तीनिहाय लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.पहिले बक्षीस : (शर्टींग फॉर मेन) आशा धर्मपाल बहादे (यवतमाळ).द्वितीय क्रमांक- (स्टील मल्टी कढई)- प्रीती अमोल शौरकार (वणी यवतमाळ), अर्चना अनील चाळीसगाव (यवतमाळ), फर्जाना परवीन अशकील शेख (यवतमाळ) . तृतीय बक्षीस- (कटलरी सेट)- , लता देवेंद्र कटकतलवारे (यवतमाळ), पूष्पा श्रीधर गुजरवार (यवतमाळ), अश्विनी अरुण शिक्रे (यवतमाळ), अंजली कपिल शामकुवर (यवतमाळ).चौथे बक्षीस - (कूक अॅण्ड सर्व्ह सेट) - सुरभी दिलीप चौधारी (यवतमाळ), मीनल रवींद्र महाडकर (यवतमाळ), पपिता रवींद्र नीळ (यवतमाळ), संगीता प्रदीप वानकर (यवतमाळ), लक्ष्मी किशोर जयस्वाल (यवतमाळ).पाचवे बक्षीस - (प्रोत्साहनपर)- प्रेरणा संदीप रोंडेकर (यवतमाळ), ममता इसासरे (यवतमाळ), प्रतिभा शिंदे (यवतमाळ), बबिता टाके, जयश्री वाकोडे (पांढरकवडा), प्रीती ठाकरे (यवतमाळ), मंजूषा विजय कोल्हे (यवतमाळ), रेखा उमेश वाजपेयी (यवतमाळ) आदी. अधिक माहितीकरिता जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क साधावा. गिफ्ट २१ मार्चपासून लोकमत जिल्हा कार्यालय गांधी चौक, यवतमाळ येथे उपलब्ध होतील.
नाशिकच्या चेतना ढोकळे महाबम्पर १०० ग्रॅम सोन्याच्या मानकरी
By admin | Published: March 14, 2016 2:47 AM