लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॅशनल कॉन्फरन्स आॅन रिसेंट ट्रेड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ ही राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद पार पडली. यात देशातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले शोधनिबंध सादर केले.मेकॅनिकल इंजिनीअरिंंग विभागातर्फे सिव्हील, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टेक्सटाईल, इलेक्ट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केली होती. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या तांत्रिक आव्हानांची जाणीव व्हावी आणि अभ्यासक्रमासोबतच कौशल्य विकासावर भर देण्याच्या उद्देशाने ही परिषद घेण्यात आली. प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी अध्यक्षस्थानी होते.परिषद संयोजक व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. राजेशकुमार उत्तमराव संभे यांनी या परिषदेचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे यंग सायंटिस्ट अजिंक्य कोट्टावार यांनी संशोधन व विकासाचे महत्त्व नमूद केले. संचालन प्रा. मोहीत पोपट यांनी, तर आभार आयोजन सचिव डॉ. उमाकांत कोंगरे यांनी मानले.या परिषदेत देशाच्या विविध महाविद्यालयातील ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. उत्कृष्ट शोधनिबंध इंटरनॅशनल जर्नल आॅफ इंजिनिअरिंग अप्लीकेशन अँड टेक्नॉलॉजी या नामवंत टेक्नीकल जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहे. पाच विभागात शोधनिबंध सादरीकरण झाले. एक टेक्नीकल गेमिंग इव्हेंटचा विभाग होता. विविध महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी शोधनिबंधाचे परिक्षण केले.पाचही विभागात ‘जेडीआयईटी’ प्रथम‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पाचही विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. पहिल्या विभागात रूचिक व्यवहारे ग्रुप, दुसऱ्या विभागात साक्षी कुसनेनवार, तिसºया विभागात शुभम लाढी, चौथ्या विभागात अभिजित मंगरे, तर पाचव्या विभागातून सेजल तायडे ग्रुपने प्रथम स्थान पटकाविले. गेमिंग इव्हेंटमध्ये ब्लार्इंड-सी विभागात जेडीआयईटीची अश्विनी जगताप प्रथम, तर लॅनगेमिंग एनएफएक्समध्ये अनिकेत अंगाईतकर याने प्रथम स्थान प्राप्त केले. लॅनगेमिंग सीएस-गो मधून धामणगाव पौलिटेक्नीकच्या गिरिश राऊत याने प्रथम येण्याचा मान पटकाविला.
‘जेडीआयईटी’मध्ये राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:41 PM
जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॅशनल कॉन्फरन्स आॅन रिसेंट ट्रेड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’ ही राष्ट्रीयस्तरावरील तांत्रिक परिषद पार पडली. यात देशातील अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपले शोधनिबंध सादर केले.
ठळक मुद्देदेशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग : नामवंत टेक्निकल जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित होणार