लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय क्रीडा दिन अन् हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट व क्रीडा भारती यांनी हे उपक्रम घेतले. मेजर ध्यानचंद चौकाचे नामकरण झाल्यानंतर खेळाडूंची क्रीडा रॅली, त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर चमकलेल्या ७० खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सत्यसाई ज्योत मंगल कार्यालयासमोरील चौकाला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचे नाव देत नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष कांचन चौधरी, हॉकी असोसिएशनचे व क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष सतीश फाटक, विदर्भ हॉकी संघटनेचे प्रमोद जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नगरसेवक पंकज देशमुख, शिवसेनेचे संतोष ढवळे, अमोल बोदडे, राजेंद्र पाटील, डॉ.दीपक शिरभाते, बबलू यादव, अनिल नायडू, राजेश गढिकर, अजय म्हसाळकर आदी उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेत आपला लौकिक उमटविणारे क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, किरण फुलझेले, नीलेश भगत, प्रा.डॉ. विकास टोणे, आनंद भुसारी, अविनाश लोखंडे, संजय कोल्हे, राहुल ढोणे, काजल तायडे, अभिजित पवार, सुजित पथे, नामदेवराव बानोरे, बापू रामटेके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विदर्भ ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणाऱ्या महिला संघातील सर्व खेळाडूंना निखिल गुजर यांचेकडून हॉकी स्टीक व कीट बॅग भेट देण्यात आली. यानंतर दाते बीपीएड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर यवतमाळ विरूद्ध हिंगणघाट असा हॉकीचा सामना घेण्यात आला. यात हिंगणघाट संघ विजयी झाला. सामन्यानंतर शिव बोरकर, त्रिनय वानखडे, अनुष्का काळे, अमितेश बोधडे, राज कोल्हे, श्लोक पोद्दार, मनीष भगत, गौतमी देशमुख, श्रावणी पाचखेडे, मोहित चव्हाण, मार्गेश मडावी, ईश्वरी गोलाईत, श्रेयस निकम, तुषार मुने, राहुल भालेराव यांच्यासह राष्ट्रीयस्तरावरून खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संतोषी साऊळकर यांनी लिहिलेल्या योग पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, शरयू रोहनकर यांनी मार्गदर्शन केले. वायपीएस शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा नृत्य, तर एसओएस शाळेच्या चमूने स्वागत गीत गायिले. प्रास्ताविक हॉकी असोसिएशनचे सचिव मनीष आखरे यांनी आणि संचालन प्रा. अनंत पांडे, तर आभार प्रा.डॉ. विकास टोणे यांनी मानले.
राष्ट्रीय क्रीडादिन विविध उपक्रमाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 9:49 PM
राष्ट्रीय क्रीडा दिन अन् हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. हॉकी असोसिएशन आॅफ डिस्ट्रीक्ट व क्रीडा भारती यांनी हे उपक्रम घेतले.
ठळक मुद्देमेजर ध्यानचंद जयंती : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या ७० खेळाडूंचा सत्कार