उमरखेड : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीने निवेदन देऊन तालुका व जिल्ह्याचा विकास करण्याचे साकडे घातले आहे.
परिरसरात १८ हजार ऊस उत्पादक आहेत. मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर आणि विदर्भातील पुसद, महागाव, उमरखेड अशा पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेला वसंत कारखाना तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभारामुळे बंद पडला. या कारखान्याला शासन स्तरावर उभारी देऊन कारखाना भाडे तत्त्वावर देऊन सुरू करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
उमरखेड मतदारसंघ राखीव असून येथे काँग्रेसने दोनदा उमेदवार उभा केला. मात्र, त्यांचा पराभव झाला. आता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला सोडून पक्षाचा उमेदवार द्यावा. सिंचनाची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी द्यावे. पैनगंगा नदीपात्रात बंधारे बांधावेत. दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा पुतळा उभारण्यात यावा. २५ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. आमदार इंद्रनील नाईक व जिल्हा अध्यक्ष खाजा बेग यांचे पक्षातील कार्य पाहता त्यांना उच्च स्थान द्यावे, अशा मागण्याही तालुका ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष बळवंतराव चव्हाण यांनी केल्या. या वेळी प्रदीप देवसरकर, अविनाश आसोले, वि. ना. कदम, प्रेम हानवते, गुणवंत सूूर्यवंशी, इजाज जनाब, शंकर कदम, सूरज देशमुख, जॉकी राज, कैलास राठोड, निरंतर पाटील आदी उपस्थित होते.