शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘झेडपी’च्या सत्तेतून राष्ट्रवादी ‘आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 10:23 PM

गेली सव्वादोन वर्ष सत्तेची चव चाखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी अखेर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्याच वेळी शिवसेनेची सत्तेत एन्ट्री झाली. पांढरकवडा तालुक्यातील गजानन बेजंकीवार व दारव्हा तालुक्यातील कालिंदा पवार या शिवसेनेच्या सदस्यांची जिल्हा परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देशिवसेनेची ‘एन्ट्री’ : दोन्ही सभापती बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेली सव्वादोन वर्ष सत्तेची चव चाखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी अखेर जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्याच वेळी शिवसेनेची सत्तेत एन्ट्री झाली. पांढरकवडा तालुक्यातील गजानन बेजंकीवार व दारव्हा तालुक्यातील कालिंदा पवार या शिवसेनेच्या सदस्यांची जिल्हा परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.शुक्रवारी शिवसेनेच्या सदस्यांची एका ठिकाणी बैठक पार पडली. युतीकडे ३८ सदस्य असल्याने सभापतींच्या दोन्ही पदांवर दावा ठोकण्याचा निर्णय सेनेच्या या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत गजानन बेजंकीवार व कालिंदा पवार यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल केले. अन्य कुणाचाही अर्ज नसल्याने यवतमाळचे एसडीओ तथा पीठासीन अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी या दोघांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा केली. या सभेकडे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पाठ फिरविली. एवढेच नव्हे तर खुद्द अध्यक्षही या सभापती निवडीच्या वेळी गैरहजर होत्या.जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती अपक्ष नंदिनी दरणे यांच्यावर ३ मे रोजी अविश्वास ठराव पारित झाला होता. हा ठराव पारित करताना राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही शिवसेना- भाजप युतीला सहकार्य केले होते. त्यामुळे नवीन निवडीत दोन पैकी एक पद राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र शिवसेना-भाजप युतीने या दोन्ही पदांवर आपल्या सदस्यांना विराजमान केल्याने राष्ट्रवादीला सव्वादोन वर्षानंतर सत्तेतून ‘आऊट’ व्हावे लागले.सव्वादोन वर्षांपूर्वी सर्वाधिक २० सदस्य असलेल्या शिवसेनेला सत्तेत प्रवेश करता आला नाही. ऐनवेळी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीने शिवसेनेचे गणित बिघडविले होते. तेव्हापासून शिवसेनेने सभागृहात आक्रमकपणे विरोधी पक्ष म्हणून किल्ला लढविला. मात्र शिवसेना सदस्यांमध्ये सत्तेप्रती सतत अपेक्षा दिसून येत होती. केंद्र व राज्यात युती असल्याने शिवसेनेला जिल्हा परिषदेतही सत्ता खुणावत होती. मात्र सव्वादोन वर्षे त्यांना संधी मिळाली नाही.अखेर अविश्वास ठरावानंतर शिवसेनेला सत्तेची चव चाखायला मिळाली. शुक्रवारी रिक्त असलेल्या दोन सभापती पदांवर शिवसेना सदस्य गजानन बेजंकीवार आणि कालिंदा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षांसह काँग्रेस-राकाँ सदस्य गैरहजरलोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य स्तरावर शिवसेना-भाजप युती झाल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणात उलथापालथ झाली. त्यातूनच राष्ट्रवादीचे मानकर व अपक्ष दरणे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. त्यासाठी युतीने काँग्रेस व राष्ट्रवादीची मदत घेतली. मात्र रिक्त पदांवर सभापतींची निवड करताना युतीने या दोन्ही पक्षांना झटका दिला. राष्ट्रवादीला सत्तेबाहेर पडावे लागले. सध्या युतीसह काँग्रेसही सत्तेत विराजमान आहे. शिवसेना-भाजप आणि काँग्रेसची प्रत्येकी दोन पदाधिकारी सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसले आहे. काँग्रेसने अध्यक्षपद वाचविण्यासाठी अविश्वास ठरावादरम्यान युतीला मदत केली. त्याचे फळही काँग्रेसला मिळाले आहे. मात्र अविश्वासात मदत करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेबाहेर पडावे लागले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना