लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभदेखील मिळाला नाही.वणी तालुक्यात १७ हजार ४३० शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे टार्गेट होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेले कर्ज वाटपाचे टार्गेट जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्यास चालढकल केल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँकेच्या वणी शाखेला ९८० शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र या बँकेने केवळ ५६० शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण केले. सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ९०० पैकी ५६० शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले. विदर्भ क्षेत्रिय ग्रामीण बँकेने ७०० पैकी ५३० शेतकºयांना कर्ज दिले. एचडीएफसी बँकेने दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक कर्जाचे वाटप शेतकºयांना केले. यासह अन्य राष्ट्रीयीकृत बँकांनी ५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी शेतकºयांना कर्जाचे वाटप केले. वणी तालुक्यातील सहा हजार २२७ शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहेत.मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मागील वर्षी पाऊसच न झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला. ही बाब गांभीर्याने घेऊन शासनाने यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. एवढेच नव्हे तर प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिले होते. मात्र या निर्देशाकडे राष्ट्रीयीकृत बँकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मारेगाव तालुक्यात सात हजार २४० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे टार्गेट बँकांना देण्यात आले होते. मात्र या तालुक्यात पाच हजार ९७० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.पीक विम्यातून सुरू आहे थकीत कर्जाची कपातमागील काही वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीशी तोंड देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे उत्पादन घटले. त्यातच मागील वर्षी कपाशी पिकावर बोंडअळीने हल्ला चढविला. परिणामी शेतकऱ्यांना २५ टक्केही कापूस हाती आला नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होत आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँका पिक विम्याची ही रक्कम संबंधित शेतकºयाच्या कर्जात वळती करीत असल्याच्या तक्रारी अनेक शेतकºयांनी केल्या आहेत. हा प्रकार थांबविण्याची मागणी आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांची वणीत पीक कर्ज वाटपास नकारघंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:34 PM
शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असतानाही वणी उपविभागातील राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली. परिणामी वणी उपविभागातील वणीसह मारेगाव तालुक्यातील सात हजार ४९७ शेतकरी या हंगामात कर्जापासून वंचित राहिले. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभदेखील मिळाला नाही.
ठळक मुद्देटार्गेट अपूर्ण : वणी उपविभागात सात हजारांवर शेतकरी वंचित