रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी दुधाळ गाई-म्हशीच्या वाटपात देशी गाईच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान ५० ते ७५ टक्केच्या घरात असणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या निर्णयामुळे गोपालकांना देशी गाईच्या खरेदीवर भर देता येणार आहे. यामुळे गोधन वृद्धिंगत होण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायात अधिक उत्पादन मिळावे म्हणून गोपालक आणि शेतकरी होस्टेज गाईची खरेदी करतात. देशी गार्इंना खरेदी करताना कुठलेही अनुदान मिळत नाही. यामुळे या गाईच्या दुधाला मागणी असली तरी देशी गाईच्या संख्येत वाढ झाली नाही. याचा फटका कृषी अर्थव्यवस्थेला बसला आहे. देशी गाईची संख्या दिवसेन्दिवस कमी होत आहे. यामुळे सेंद्रीय शेतीची चळवळही कमकुवत होत आहे. देशी गाईच्या संवर्धनात अनुदान दिल्याने पुढील काळात या गार्इंची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.देशी गाईमधील गीर, रेड सिंधी, सहिवाल, राठी, थारपारकर देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातीच्या गार्इंचा यामध्ये समावेश आहे. या देशी वाणाच्या गाई गोपालकांना अनुदानावर खरेदी करता येणार आहे. ८५ हजारापर्यंत दोन गाई खरेदी करता येणार आहे. सहा गार्इंच्या खरेदीसाठी तीन लाख ३५ हजारापर्यंतची मर्यादा राहणार आहे. ही योजना खुल्या गटासाठी ५० टक्के अनुदानावर राहणार आहे. तर अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर राबविली जाणार आहे.देशी दुध वाढेलदेशी गाईकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले. पशुसंवर्धन विभागाच्या नवीन निर्णयामुळे देशी गाईच्या संवर्धनासाठी अनेक गोपालक पुढे येतील. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शेती शेणखतयुक्त होईल. गोमुत्राच्या माध्यमातून पिकांचे उत्पादनही वाढविता येणार आहे. यामुळे देशी दुधाचे प्रमाण वाढेल. या अनुषंगाने स्थानिक बाजारात देशी गाईचे तूप, दही, ताक, पेढा, गुलाबजाम यासारखे अनेक प्रकार वाढेल. यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची प्रगती होण्यास मोलाचा हातभार लाभणार आहे.
दुधाळ जनावरे वाटपात मिळणार देशी गाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:16 PM
देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी दुधाळ गाई-म्हशीच्या वाटपात देशी गाईच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान ५० ते ७५ टक्केच्या घरात असणार आहे.
ठळक मुद्दे५० ते ७५ टक्के अनुदान८५ हजारांपासून साडेतीन लाखांपर्यंत खरेदी करता येणार