पुसद : नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विविध बंजारा संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन
पाठविले.
येथे विविध संघटनांच्या वतीने वसंतराव नाईक जयंतीदिनी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला. नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळास माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे. विमुक्त जातीला पदोन्नतीमधील आरक्षण सुरू ठेवावे, विमुक्त जातीला नॉन क्रिमीलेअर अट रद्द करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ, भारतीय बंजारा कर्मचारी सेवा संस्था, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, जगदंबा देवी संस्थान, संत सेवालाल समिती, नॅशनल सेवा डॉक्टर्स असोसिएशन, बंजारा वकील संघटना, बंजारा महिला मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात आले.
एसडीओंच्या वतीने नायब तहसीलदार वसंत राठोड यांनी निवेदन स्वीकारले.
याप्रसंगी दयाराम चव्हाण, के.एस. राठोड, प्रा. संजय चव्हाण, राजाराम राठोड, के.डी. राठोड, डॉ. मधुकर नाईक, सकलाल राठोड, ॲड. दिनेश राठोड, याडीकार पंजाब चव्हाण, प्रा.टी.आर. आडे, प्रा.जे.के. राठोड, प्रा. उल्हास चव्हाण, विजय वडते, प्रा. वसंत राठोड, कमलसिंग राठोड, उत्तम जाधव, गोविंद चव्हाण, विजय चव्हाण, जयसिंग राठोड, दुर्गेश राठोड, एन.डी. राठोड, नंदेश चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर आडे, सुदाम पवार, विजय राठोड, बी.पी. राठोड, बाबुलाल राठोड, के.आर. पवार, माणिक राठोड, राजूसिंग राठोड आदी उपस्थित होते.