शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

नयनतारा तू जर आली असती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:33 PM

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले.

ठळक मुद्देनिमंत्रितांचे कविसंमेलन : ज्वलंत विषयांना वाचा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :इथल्या विधवांच्या कपाळावर ज्यांनी कोरलं वैधव्य, त्यांना कशी चपराक बसली असती,नयनतारा तू जर आली असतीदेश स्वतंत्र झाला सत्तेच्या समीकरणातगुलामीच्या मानसिकता घट्ट झाल्यातसेच पुरूषत्व षंढ झालेमाणुसकीचे उभे धिंगाणे झाले‘कोणी चोर कोणी शिरजोर’ या कुसूम अलाम यांच्या कवितेने उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले.शायर भाऊसाहेब पाटणकर परिसरातील प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शुक्रवारी रात्री मान्यवरांचे कविसंमेलन रंगले. यावेळी राज्यभरातून आलेल्या ४५ कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे विलास वैद्य होते.कुसूम अलाम यांनी जोहान्सबर्गमधील जागतिक परिषदेत महिला या विषयावर मत मांडले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनीही आपल्या भाषणात त्यांच्या लेखनाचा आणि कवितेचा उल्लेख केला होता. अशावेळी अलाम यांनी कविसंमेलनातही ‘नयनतारा’ सादर करून सर्वांना अंतर्मुख केले. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत रंगलेले कविसंमेलन रसिकांसाठी मेजवानी ठरले.समजू नको ढगा हे साधेसुधे बियाणेमी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणेनिसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी कविता यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यांतर्गत येणाºया पोहंडूळ येथील कवी, गझलकार आबेद शेख यांनी सादर केली.पाजून सत्तेस सांगा आज केले तुल कोणी,काय चलनाची गुलाबी ही दिली का भूल कोणीया गझलेने सत्ताधाºयांचा खरा चेहराच उघड केला. शनिवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कविसंमेलनाने प्रचंड गर्दी खेचली, खिळवून ठेवली. अनेक कवितांना ‘वन्स मोअर’ मिळाला.शेतकरी आत्महत्या आणि सध्याची सामाजिक स्थिती बहुतांश कवींच्या रचनांमधून डोकावताना दिसली. परळी वैजनाथ (बिड) येथील अरुण पवार यांनी मायबापाचे होणारे हाल मांडले.वायले राहिले मुलं, दोघांची वाटणीमाय परसात, बाप गोठ्याचा धनीया त्यांच्या रचनेने टाळ्यांची दाद मिळविली. अकोल्याचे कवी प्रशांत असनारे यांनी मुक्तछंदातून ‘माणूस’ टिपला.देव म्हणाला,तुला काहीच कसं जमत नाहीजा! तू माणूस होतेव्हापासून मी हा असामाणूस म्हणून जगतोयया कवितेवर त्यांनी रसिकांची दाद मिळविली. हिंगोलीचे विलास वैद्य यांच्या अध्यक्षतेत रंगलेल्या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन योगीराज माने यांनी केले. अभय दाणी यांनी भौतिक विश्वात माणसाचे स्वत:शी चाललेले युद्ध आपल्या कवितेत मांडले.या दिवसभराच्या पेटलेल्या हातांनी मीतुझा मेणाचा पुतळा उभा केला रात्रीतून तरतू सकाळी हा राजतिलक लावलास माथ्यावर माझ्यामी घोड्यावर बसूनपुन्हा युद्धभूमीवरसंमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर होणाऱ्या या कविसंमेलनावरही बहिष्काराचे सावट होते. अनेक निमंत्रित कविंनी सोशल मीडियावरुन बहिष्कार जाहीर केला होता. पण निम्म्यापेक्षा अधिक कवी व्यासपीठावर असल्याने अपेक्षेप्रमाणे कविसंमेलन रंगत गेले. चंद्रपूरच्या माधवी भट यांनी ‘गंगार्पण’ ही गझल सादर केली.इथे तू जगावे, तुला तू मिळावेतुझा दीप पात्रात, मी सोडलापुण्याच्या अपर्णा मोहिले, विनोद बुरबुरे, विद्धार्थ भगत, नीलकृष्ण देशपांडे, नितीन नायगावकर आदींनी आपल्या कवितांमधून रसिकांची मनेजिंकली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन