शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी

By admin | Published: December 29, 2016 12:29 AM

नगरपरिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापनेबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

पुसद नगरपरिषद : काँग्रेसला स्वीकृत सदस्य व सभापतिपदाची अपेक्षा पुसद : नगरपरिषदेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने सत्ता स्थापनेबाबत शहरवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये आघाडी झाल्याने सत्ता स्थापनेचे तर्कवितर्क संपले असून काँग्रेसला आता एक स्वीकृत सदस्य व बांधकाम सभापतिपद मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. पुसद नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. २७ नोव्हेंबरला नगरपरिषदेची निवडणूक होवून २८ नोव्हेंबरला मतमोजणी झाली. तब्बल ६५ वर्षानंतर नगराध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा नाईक घराण्याकडे आली. यापूर्वी १९४६ ते १९५२ या कालावधीत राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे नगराध्यक्ष म्हणून थेट जनतेतून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांच्याच स्रुषा अनिताताई मनोहरराव नाईक या थेट जनतेतून निवडून येवून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. पुसद नगरपरिषदेंतर्गत एकूण १४ प्रभागातून २९ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे तीन, भाजपाचे दहा व शिवसेनेचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी किमान १५ नगरसेवक आवश्यक असल्याने व कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने त्रिशंकू अवस्थेत नेमके काय घडणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना काँग्रेसच्या त्या तीन नगरसेवकांवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. मात्र अखेर सर्व सुंदोपसुंदीवर पडदा पडला असून काँग्रेसचे तीन नगरसेवक व राष्ट्रवादीचे १२ असे मिळून १५ नगरसेवकांची आघाडी झाली. यामध्ये काँग्रेसला एक नगरसेवक व बांधकाम सभापती मिळणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद, पाणीपुरवठा, आरोग्य आणि महिला बालकल्याण सभापती आदी पदे मिळणार असल्याचे कळते. याबाबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष लवकरच सर्व नगरसेवकांची पहिली सभा बोलावतील व त्यामध्ये या सर्व बाबींचा खुलासा होईल. मात्र प्रशासनाच्या पत्रानुसार व विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ २७ डिसेंबर रोजी संपल्याने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिताताई नाईक यांनी अधिकृतपणे पदाचा कार्यभार स्वीकारला. (लोकमत चमू)