शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
3
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
4
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
5
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
6
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
7
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
8
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
9
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
10
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
11
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
12
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
13
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
14
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
15
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
16
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
17
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
18
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
19
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
20
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल

दारव्हा येथे राष्ट्रवादीचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 10:22 PM

केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देएसडीओ कार्यालयावर धडक : केंद्र व राज्य सरकारचा निषेधलोकमत न्यूज नेटवर्क

दारव्हा : केंद्र व राज्य सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. नरेंद्र आणि देवेंद्र सरकारच्या फसव्या घोषणांमुळे शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येथील उपविभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.स्थानिक गजानन महाराज मंदिरातून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक चौक, गोळीबार चौक, तेलीपुरा, पोस्ट आॅफिस चौक मार्गे हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला संबोधित करताना संयोजक व प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या घोषणांवर आसूड ओढला. किती घोषणांची अंमलबजावणी झाली याचे उत्तर सरकारने द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, शेतातील सर्व कामे मनरेगा अंतर्गत करावी, शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, फवारणीबाधित शेतकरी कुटुंबांना दहा लाखांची मदत द्यावी, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी मंचावर आमदार ख्वाजा बेग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, माजी प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उत्तमराव शेळके, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर, आर्णी बाजार समितीचे सभापती राजू पाटील, अ‍ॅड. आशीष देशमुख आदी उपस्थित होते.भर उन्हात या मोर्चात दारव्हा, दिग्रस, नेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. गेल्या १६ एप्रिलपासून राष्ट्रवादीने या तीनही तालुक्यात हल्लाबोल आंदोलन सुरू केले. शुक्रवारच्या मोर्चाने या आंदोलनाचा समारोप झाला.अनेक पदाधिकारी उशिरा पोहोचलेया आंदोलनात राष्ट्रवादीचे अनेक माजी मंत्री, पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र माजी मंत्री अनिल देशमुख सभास्थळी पोहोचले. त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना केवळ घोषणांचा बाजार मांडणाºया शासनामुळे शेतकरी व जनतेचे हाल होत असल्याचा आरोप केला. केंद्र व राज्य सरकार शेतकºयांपेक्षा उद्योगपतींचेच असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईकही उशिराने सभास्थळी पोहोचले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस