लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय शोधनिबंध परिषद (एनसीआरटीईटी-२०१७) घेण्यात आली. सिव्हील इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग विभाग आणि इंटरनॅशनल जर्नल फॉर इंजिनिअरिंग अॅप्लीकेशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडली. यामध्ये देशभरातून आलेले २५० हून अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले.परिषदेचे उद्घाटन संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांच्या हस्ते सोवेनिअरचे प्रकाशन करून झाले. प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, परिषदेचे संयोजक डॉ. रामचंद्र तत्त्ववादी, सहसंयोजक डॉ. अतुल बोराडे, प्रा. अजय पारडे, आयोजन सचिव प्रा. अभिजित गिरी आदी मंचावर उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले.सिव्हील इंजिनिअरिंग विभागातून प्रथम बक्षीस बाबासाहेब नाईक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या प्रज्ज्वल गावंडे व सहकाºयांना मिळाले. द्वितीय बक्षीस जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जयेश फुलबांधे व चमूला प्राप्त झाले. शासकीय तंत्रनिकेतनची मिनल काटपल्लीवार व चमूला प्रोत्साहनपर बक्षिसाचा मान मिळाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून जेडीआयईटीचे ध्रुव आनंदपारा व सहकाºयांना प्रथम, द्वितीय बक्षीस प्रा. राम मेघे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेराचे आयूष गुप्ता व सहकारी, तर प्रोत्साहनपर बक्षीस जेडीआयईटीतील यश कुंभारे व चमूला मिळाले.केमिकल इंजिनिअरिंग/बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागातून जेडीअीायईटीच्या राहुल तापके व चमूला प्रथम बक्षीस प्राप्त झाले. डॉ. भाऊसाहेब नंदूरकर अभियांत्रिकीचे प्रतिमा सिंग व चमूला द्वितीय, तर जेडीआयईटीतील सुमित खरगे व सहकाºयांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रीकल/टेक्सटाईल इंजिनिअरिंग या संयुक्त विभागातून प्रथम बक्षीस जेडीआयईटीतील स्वाती तोंडवळ व चमूला प्राप्त झाले. डॉ. एन.पी. हिराणी पॉलिटेक्नीक पुसदच्या हृतिक कटकमवर व सहकाºयांना द्वितीय, तर जेडीअीायईटीतील हर्षल सम्रीत व चमूला प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले.कॉम्प्यूटर इंजिनिअरिंग विभागातून जेडीआयईटीची अश्विनी बोरा व चमू प्रथम बक्षिसाची मानकरी ठरली. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकीतील रिषभदेव शुक्ला व सहकाºयांना दुसरे बक्षीस मिळाले. जेडीआयईटीतील अक्षय लुणावत व चमूला प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. बक्षीस वितरणाने परिषदेची सांगता झाली. संचालन ऐश्वर्या गोटेकर, तर आभार डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांनी मानले.परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा. रिना पानतावणे, प्रा. पंकज गावंडे, प्रा. योगेश बोरकर, प्रा. मयूर जिरापुरे, प्रा. अनुराग ढोले, प्रा. हितेश मेहता, प्रा. सफल वानखडे, प्रा. अतुल शिंदे, प्रा. मयूरी शेठिया, प्रा. पल्लवी कुंभारे, प्रा. पवन मोखडकर, प्रा. महेश गोरडे, राजेश गेडाम, चंद्रकांत शंभरकर, नितीन शेंद्रे, मनिष गुल्हाने, प्रेमेंद्र शुंकर, विद्यार्थी समन्वयक संकेत कोल्हे, सोमेश जवादे, अब्दुल तौसिफ, गौरव वारजुरकर, अभय मदनकर, शिवानी जाधव, शिवानी हातगावकर, अचल भोयर, अपूर्वा झेंडे, अंकुश शेंडे, शिमांशू पांडे आदींनी पुढाकार घेतला. परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.या परिषदेसाठी आदित्य बिर्ला ग्रुप चंद्रपूरचे सुनील देसाई, बजरंग कंस्ट्रक्शन रामटेकचे बजरंग मेहर, जीनमाता ट्रेडर्सचे संजय अग्रवाल, युनाईटेड ट्रेडर्सचे अब्दुल हुसेन, कॅड सेंटरचे विक्रम नागरगोजे, हाजी स्टोअर्सचे मक्खी सेठ, मोबाईल्स यवतमाळचे पंकज सोनटक्के, राऊत पेट्रोलपंपचे सागर राऊत, नेटलॉग सायबर कॅफेचे अजय रामेकर, साई लर्नर अकॅडमीचे अमित ढोणे, थाऊझंड पॉर्इंटचे राहुल हातागले, व्ही.एस. टोटल फिटनेसचे विवेक सजनवार, अर्नव सायबर कॅफे व गोदावरी अर्बन को-आॅप. बँकेचे सहकार्य लाभले. या प्रतिष्ठान व संस्थांच्या प्रतिनिधींचे यावेळी स्वागत करण्यात आले.
‘जेडीआयईटी’त एनसीआरटीईटी शोधनिबंध परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:28 PM
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय शोधनिबंध परिषद (एनसीआरटीईटी-२०१७) घेण्यात आली.
ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय शोधनिबंध परिषद