शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सामाजिक समतेसाठी प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:31 PM

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली.

ठळक मुद्देमाधुरी आडे : सामाजिक न्यायदिनी विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली. त्यांनी सांगितलेल्या सामाजिक समतेच्या विचारांची आजही आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर, जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे, नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, अनिल आडे आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीत प्राविण्य मिळविणारे अनिकेत निकाडे, किरण जमधाडे, मेघा मुरादे, गीतांजली वाघमारे, यश चव्हाण, रोहित जाधव, सलोनी खोब्रागडे, प्रज्वल मुनेश्वर, दिव्यानी डहाके, पल्लवी खैरमोडे यांना राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार, अर्चना गेडे, वैष्णवी गजभिये, संदीप खंदारे यांना स्वाधार योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात आला. वैभव गोरे व अभिषेक पोटे यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक एस.एस. पडाळ, शिक्षिका एम.बी. भोयर आणि ताई भरजाडे यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांनी मानले. कार्यक्रमाला माजी समाजकल्याण अधिकारी गवई, दलितमित्र पुरस्कारप्राप्त शिवराम करके, देवण्णा पालेवाल, श्रावण सोनोने, प्रल्हाद सिडाम, भगवान मुदाने, अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त केशव लोढे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीShahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंती