लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : मराठीशिक्षणाचा आग्रह ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांनी केले.येथील शिवाजी हायस्कूल मध्ये आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रा.अशोकराव ठुसे, बबनराव इरवे, पद्माकर गावंडे, भैय्यासाहेब पावडे, रवींद्र तायडे, सुभाष निमकर, जी.एम. दहापुते, एस.पी. ठाकरे, प्राचार्य जी.एम.पवार, चंद्रशेखर जवके, प्रा.सुनील नगरे, श्रीकांत चौधरी, सतीश राऊत, संजय पवार उपस्थित होते.ठाकरे यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आदी थोर समाजसुधारकांचे दाखले देऊन त्यांनी मराठीतून शिक्षण पूर्ण करून नावलौकिक मिळविल्याचे सांगितले. बबनराव इरवे,अशोकराव ठुसे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी ‘अविष्कार’ हस्तलिखिताचे व डॉ.देशमुख यांच्या प्रतिमेचे विमोचन करण्यात आले. यानंतर स्नेहसंमेलनात रांगोळी, पुष्प, चित्रकला, डीश डेकोरेशन स्पर्धा, कबड्डी, खो-खो, लंगडी आदी मैदानी खेळ घेण्यात आले. संचालन प्रा.योगेश राठोड यांनी केले.यशस्वीतेसाठी प्रा.अनिल राठोड, योगेश राठोड, अतुल वानखडे, प्रा.संजय कोल्हे, सतीश राऊत, अशोक सावंत, दादू आलोकार, नरेंद्र विझे, संजय गोलाम, दिलीप साबळे, विष्णू राठोड, एम.पी.बोबडे, विजय रंगारी, पवन चौधरी, प्रफुल बोंडे,अंकुश निचत, दिलीप कुडे आदींनी परिश्रम घेतले.
मराठी शिक्षण ही काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:18 PM
मराठी शिक्षणाचा आग्रह ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे यांनी केले. येथील शिवाजी हायस्कूल मध्ये आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख जयंती उत्सव व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ठळक मुद्देनरेशचंद्र ठाकरे : दारव्हा येथे पंजाबराव देशमुख जयंती उत्सव साजरा