शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

दगडातून देव साकारणारा समाज उपेक्षित

By admin | Published: November 18, 2015 2:46 AM

मनगटाच्या जोरावर हातोडा अन् छन्नीच्या मदतीने काळ्याशार दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे.

हातात कला पण पोटात भूक : शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ नाहीशिवानंद लोहिया हिवरीमनगटाच्या जोरावर हातोडा अन् छन्नीच्या मदतीने काळ्याशार दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे. या समाजातील बहुतांश कारागीर हे नाममात्र साक्षर आहेत. मात्र कोणत्याही विद्यापीठाची पदवी त्यांच्याकडे नाही. व्यावहारिकदृष्ट्या ते कोणत्याही नोकरीसाठी पात्र नसले तरी त्यांच्या हातात अंगभूत कौशल्य मात्र आहे. दगडाला आकार देवून देव साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यांनी साकारलेल्या देवाची घरोघरी पूजा केली जाते. मात्र तो देव साकारणाऱ्या हातांची मात्र उपेक्षा सुरू आहे. या कारागिरांच्या मूर्ती मूर्तिमंत कलेचा नमुना आहे. रानावनात धरणीमायच्या विशाल उदरात दडून बसलेल्या दगडाचा हे कारागिर शोध घेतात. आपल्या कलेद्वारे या दगडाचा देव करतात. या कलाकारांच्या घामातूनच या देवांना पहिला अभिषेक घडतो. या कारागिरांनीच साकारलेले देव श्रीमंत मंदिरांमध्ये विराजमान आहेत. मात्र दगडाला देवपण देणाऱ्या समाजाची दैना सुरू आहे. पवनसूत मारुतीरायासह नंदी, पिंड, शंकर यासह नानाविध मूर्ती हे कारागीर घडवितात. घराघरातील स्वयंपाकघरात उपयोगी असलेली पारंपरिक जाते, पाटे, वरवंटे, खलबत्ता आदी वस्तूही हे कारागिर घडवतात. या वस्तूंच्या माध्यमातून नागरिकांच्या घरातील स्वयंपाक रुचकर बनतो. मात्र या वस्तू घडविणाऱ्या कारागिरांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा जीवघेणा प्रवास पिढ्यान्पिढ्या असाच सुरू आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. अवघे जग माणसाच्या मुठीत सामावले आहे. परंतु या कारागिरांच्या कलेला अजूनही पर्याय नाही. तरीही त्यांच्या कलेची मात्र किमत केली जात नाही. आज या समाजाचा व्यवसाय संकटात सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर राबराब राबून रक्त आटविणारे हे कारागिर इतरांच्या बंगल्याचा पाया मजबूत करतात. मात्र त्यांना स्वत:ला राहण्यासाठी निवारा नाही. शासनाने या कष्टकरी उपेक्षित समाजाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.