लोकमत न्यूज नेटवर्कनेर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्ज माफी दिली आहे. टप्प्या टप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रक्रियेतील एक भाग म्हणून शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी इतर बँकांचे कर्ज नसल्याचे दाखले आणण्यास सांगितले आहे. नेर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रने नीलचे दाखले चक्क रस्त्यावर फेकल्याचा प्रकार आढळून आला. शेतकऱ्यांना बँकांकडून तुच्छतेची वागणूक दिली जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेवलेले अर्ज कुणीही येऊन घेऊन जा अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांचे धोरण नेहमीच सदोष राहिले आहे. आता शासनाने कर्जमाफी केल्यानंतरही बँका नवीन कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांना येरझारा मारायला लावत आहे. बँकेमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य वागणूकही मिळत नाही.अनेक ठिकाणी तर शेतकरी हा टिंगलटवाळीचा विषय झाला आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या दोनही बँकेतील हा प्रकार स्वत: पाहला आहे. महाराष्ट्र बँकेने नीलच्या दाखल्यासाठी लागणारे अर्ज बाहेरच फेकले आहे. यावरून शेतकऱ्यांप्रती बँकेचा दृष्टिकोन काय, हे स्पष्ट होते.कोरोना संसर्गाचा धोका असल्याने गर्दी होऊ नये म्हणून निलचे दाखले बाहेर ठेवण्यात आले आहे. एकच शिपाई आहे. मनुष्यबळाची कमी आहे. दाखल्यांजवळ एकच शिपाई असतो.- मिलिंद कांबळे, व्यवस्थापक,बँक आॅफ महाराष्ट्र, नेर.
नेरमध्ये बँकांनी नीलचे दाखले फेकले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 5:00 AM
कर्जमाफी झाल्याने नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकरी बांधव कागदाची जुळवाजुळव करत आहे. प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत दाखल्यासाठी शेतकरी जातात. तेथे दाखल्यासाठी लागणारे अर्ज बँकेत ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र बँकेने हे अर्ज चक्क रस्त्यावर फेकून दिले. बेवारस ठेवलेले अर्ज कुणीही येऊन घेऊन जा अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांचे धोरण नेहमीच सदोष राहिले आहे.
ठळक मुद्देबँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार : शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक