लोकमत न्यूज नेटवर्कनेर/राळेगाव/बाभूळगाव : असंवैधानिक सीएए व एनआरसी कायद्याविरोधात विविध संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. या बंदला नेर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदला विविध २० संघटनांनी पाठिंबा देत सदर कायदा रद्दची मागणी करण्यात आली.मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, विविध क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव आहे हे प्रश्न दुर्लक्षित करून सीएए, एनआरसी कायदा आणला.वंचित बहुजन आघाडी, भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम, भीम तरुण उत्साही मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच आदी संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. डॉ. अशोक खोब्रागडे, संघमित्रा गायकवाड, अरविंद पाटील, मनोहर देशमुख, बापूराव रंगारी, अशोक फुलझलके, प्रवीण रंगारी, मनोज झोपाटे, रवी मुंदाने, रेहान खान, प्रमोद गायकवाड, सिद्धांत मिसळे, लक्ष्मण वानखडे, सुभाष गायकवाड, अन्सार शहा, वंदना मिसळे, चंदा मिसळे, प्रीती गवई, रत्ना मिसळे, शोहेब खान, अब्दुल बाशीद, अॅड. लतिफ मिर्झा, अन्सार शहा आदींनी पुढाकार घेतला. ठाणेदार पितांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, राजेश चौधरी, प्रदीप खडके, राजू भगत, नितीन कडुकर, राजेश भगत यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.कळंब येथे तहसीलदारांना निवेदनकळंब : सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी येथे विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. प्रतीक भुजाडे, ओमप्रकाश भवरे, मधुकर अलोणे, लक्ष्मण भावे, सुनील लोणकर, गफ्फार भाई, अब्दुल खतीब, दीपक ब्राह्मणे आदींनी निवेदन सादर केले. या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.राळेगावात महिलांचा उत्स्फूर्त सहभागराळेगाव : सीएए व एनआरसी विरोधात राळेगाव शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी येथील क्रांती चौकातून रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही रॅली खरेदी विक्री संघ कार्यालय परिसरात पोहोचली. याठिकाणी मोर्चाच्या आयोजकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बहुजन क्रांती मोर्चाचे संजय इंगोले यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी शहरातील काही शाळांना सुटीही दिली होती.बाभूळगाव येथे ‘ईव्हीएम’चाही प्रश्न मांडलाबाभूळगाव : बहुजन क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी बुधवारी येथील तहसीलदारांना राष्ट्रपती यांना पाठविण्यासाठी निवेदन सादर केले. सीएए व एनआरसी कायदा रद्द करावा, ही मागणी करण्यात आली. यासोबतच ईव्हीएमद्वारे होणारी निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचीही मागणी निवेदनातून केली आहे. याशिवाय नागरिकांचे विविध प्रश्न मांडण्यात आले आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे सुरेंद्र परडखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सैयद जहीर, शेख शहेजाद, सुधाकर दातार, अनिकेत राऊत, किरण लोहोटे, मिलिंद दातार, विजयराज शेगेकर आदी उपस्थित होते.
नेर, राळेगावात बंद संमिश्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 6:00 AM
मौलाना रिजवान कुरैशी, मुन्ना शेख, सुनील गवई, नजीर राही यांच्या नेतृत्त्वात शहरातून मोर्चा काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत संपूर्ण प्रमुख बाजारपेठ बंद ठेवली होती. देशात अर्थव्यवस्था ढासळत आहे, महागाईचा निर्देशांक उच्चांक गाठत आहे, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे, विविध क्षेत्रात मनुष्यबळाचा अभाव आहे हे प्रश्न दुर्लक्षित करून सीएए, एनआरसी कायदा आणला.
ठळक मुद्देसीएए, एनआरसी कायदा रद्द करा : बाभूळगाव, नेर, कळंब येथे तालुका प्रशासनाला निवेदन