लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यात शनिवारी दोन तास धुवाधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील मिलमिली नदीला पूर आला. गेल्या अनेक दिवसांपासून अतिशय संथगतीने नदीवर सुरू असलेले पुलाचे काम पावसाने कायमचे बंद पाडले. अर्धवट पूल वाहून गेला. तर अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तांराबळ उडाली.शहराच्या मधात असलेल्या मिलमिली नदीवरील पूल गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारीही केल्या. परंतु त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. शनिवारी झालेल्या पावसाने हा पूल वाहून गेला. तात्पूरता जाण्याकरिता बनवलेला कच्चा पूलही वाहून गेला. त्यामुळे शहरात जाणारा रस्ता बंद झाला. त्यामुळे तारांबळ उडाली आहे शेतीपयोगी साहित्य, भाजीपाल्याचे पीक, पाईप पुरामध्ये वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
नेर शहरातील अर्धवट पूल गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:08 PM