लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील विदर्भ जिनिंगला बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत रुई गठाणी, इंडिका कार जळून भस्मसात झाली. तर गोठ्यातील एक म्हैसही आगीत जखमी झाली. सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.येथील अमरावती मार्गावर मोबीन नूर खान पठाण यांचे विदर्भ जिनिंग आहे. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जिनिंगच्या आवारात ठेवलेल्या रूई गठाणीला अचानक आग लागली. वाऱ्याचा वेग आणि तळपते उन्ह असल्याने ही आग वेगात पसरली. याच परिसरात असलेली माजी नगराध्यक्ष सत्यविजय गुल्हाने यांची इंडिका कार आगीत भस्मसात झाली. तर जिनिंगच्या बाजूला असलेल्या रमेश पाटील यांच्या गोठ्यालाही आगीची झळ बसली. त्यांच्या गोठ्यातील म्हैस गंभीर जखमी झाली. आगीची माहिती मिळताच नेर व दारव्हा येथील अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी आग आटोक्यात आणली. या आगीत १२ लाखांच्या रूई गठाणीसह २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किने लागल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळाला पीएसआय अजय भुसारी व नेर नगर परिषद उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी भेट दिली.
नेरच्या विदर्भ जिनिंगला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:35 PM
येथील विदर्भ जिनिंगला बुधवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत रुई गठाणी, इंडिका कार जळून भस्मसात झाली. तर गोठ्यातील एक म्हैसही आगीत जखमी झाली. सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले.
ठळक मुद्दे२० लाखांचे नुकसान : रूई गठाणी, इंडिका कार भस्मसात