शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

मांडव परतणीसाठी निघालेल्या नवविवाहितेवर काळाचा घाला; दोन भाऊही दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 10:03 PM

Yawatmal News सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देतिघा भावा-बहिणींना एकाच चितेवर दिला अग्नी

अविनाश खंदारे

यवतमाळ : साखरा गावाला लेकीच्या जाण्याने दु:खाच्या डोहात बुडवून टाकले. कारण या गावातील लेक लग्नानंतर सासरी नव्हे, तर जगातूनच कायमची निघून गेली. सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम पसरली. गावात एकाही घरी चूल पेटली नाही.

साखरा येथील ज्ञानेश्वर पामलवाड यांची मुलगी पूजा हिचा विवाह १९ फेब्रुवारीला जारीकोट ता. धर्माबाद, जि. नांदेड येथील नागेश साहेबराव कन्हेवाड यांच्याशी पार पडला. लग्नानंतर नवरी-नवरदेव आपल्या गावाकडे परत गेले. मात्र रितीरिवाजाप्रमाणे नववधूला मांडव परतणीसाठी पुन्हा माहेरी आणण्यासाठी सोमवारी २१ फेब्रुवारीला माहेरकडील मंडळी गेली होती. नववधू व नवरदेव यांना घेऊन ते सर्वजण एमएच-२९-एआर-३२१९ क्रमांकाच्या वाहनाने साखरा गावाकडे येत होते. मात्र सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या ढाब्यासमोर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. हिमायतनगरकडून नांदेडकडे विटा घेऊन निघालेल्या टाटा-४०७ या वाहनाने त्यांना कारला धडक दिली. त्यात पूजा ज्ञानेश्वर पामलवाड (२०) ही नववधू, दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड (२२) हा तिचा सख्खा भाऊ, संतोष परमेश्वर पामलवाड (३२) हा चुलत भाऊ आणि माधव पूरबाजी साेपेवाड (३०) हे जागीच ठार झाले. तसेच गाडी चालक सुनील दिगांबर धोटे रा. चालगणी याचाही या भीषण अपघातात मृत्यू झाला.

मंगळवारी पूजा, दत्ता आणि संतोष या तीनही बहीण- भावांच्या मृतदेहांंना साखरा गावात एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी साखरा गावासह संपूर्ण पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते.

सुनीलच्या मृत्यूने चालगणी भावविवश

या अपघातात दगावलेला वाहनचालक सुनील दिगांबर धोटे (३०) हा चालगणी येथील रहिवासी होता. घरातील परिस्थिती जेमतेम असल्याने वाहन चालवून तो आपल्या कुटुंबाची गुजराण करीत होता. त्याच्या पार्थिवावर चालगणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. चालगणी गावात प्रत्येकाला मदत करणारा, कुणाच्याही आजारात रात्री-अपरात्री धावून जाणारा रुग्णसेवक म्हणून सुनीलची ओळख होती. त्याच्या मृत्यूने संपूर्ण चालगणी गाव हळहळत आहे.

मुलगा गेला, मुलगी गेली, उरले सुने घर

या अपघाताने ज्ञानेश्वर व साधना पामलवाड यांची मुलगी पूजा आणि मुलगा दत्ता या दोघांनाही हिरावून नेले. मुलीचे लग्न आटोपून महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्याच्या आनंदात हे आई-वडील होते. आता एकुलता एक मुलगा दत्ता याच्या आधाराने पुढचे जीवन आनंदात घालवायचे त्यांचे दिवस आले होते. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातला.

नवरदेवाची मृत्यूशी झुंज सुरू

भोकरजवळ झालेल्या वाहन अपघातात नववधू पूजा हिचा जागीच मृत्यू झाला, तर नवरदेव नागेश साहेबराव कन्हेवाड हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात