लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी कॅलिफोर्नियातील स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तांत्रिक मदतीने एनआयसीयू (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) तयार केले जात आहे. यासाठी कॅलिफोर्नियाच्या तज्ज्ञांनी मेडिकलमध्ये येऊन पाहणी केली. यावेळी टाटा ट्रस्टचे समन्वयकही उपस्थित होते.यवतमाळ सारख्या दुर्गम जिल्ह्यात विविध कारणांनी बालमृत्यू होत आहे. अनेकदा उपचाराची सुविधा नसल्याने शासकीय रुग्णालयात प्रसूती होऊनही बालमृत्यू होतात. यासाठी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. लगेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद मिळाला. वॉर प्रोजेक्टमध्ये याचा समावेश केला. टाटा ट्रस्टनेही प्रकल्पासाठी अर्थसहायाची तयारी दर्शविली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.यवतमाळ मेडिकलमध्ये ५० बेडचा नवजात शिशू अतिदक्षता कक्ष उभारण्यात येणार आहे. या करिता स्टॅन्ड फोर्ड युनिव्हर्सिटी तंत्रज्ञान पुरविणार आहे. शुक्रवारी दुपारी कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञ डॉ. नीलिमा राघवन, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.शैला आणि टाटा ट्रस्टचे समन्वयक डॉ. विक्रम शहाने यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बालरोग विभाग आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांची या तज्ज्ञांनी संयुक्त बैठक घेतली. नवजात शिशू अतिदक्षता कक्ष तयार करण्याबाबत हे तज्ज्ञ आता अहवाल पाठविणार आहे. मेडिकलमध्ये सध्या अस्तित्वात असलेला बालरोग विभाग वार्ड क्र. १० मधून जुन्या इमारतीत हलविण्याचे प्रस्तावित आहे. त्या जागेवर ५० बेड क्षमतेचा एनआयसीयू कक्ष साकारण्यात येईल, असे डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले. या सुविधेमुळे बाल रोग विभागाचा कायापालट होणार आहे.‘एमसीआय’च्या चमूकडून तपासणीमेडिकलमधील अस्थीव्यंगोपचार विभाग आणि पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी सुविधांची पाहणी करण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची (एमसीआय) दिल्लीची चमू मेडिकलमध्ये आली होती. ही चमू अहवाल देणार आहे.
नवजात शिशूंसाठी ‘मेडिकल’मध्ये एनआयसीयू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 9:47 PM
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी कॅलिफोर्नियातील स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तांत्रिक मदतीने एनआयसीयू (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) तयार केले जात आहे.
ठळक मुद्देकॅलिफोर्नियाच्या चमूकडून पाहणी : टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनाचा पुढाकार