शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

निळोणा, चापडोहमध्ये ७० टक्के पाणी, तरी यवतमाळ शहर तहानलेलेच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही.

ठळक मुद्देमाळपठारावरील ६५ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या कृपेने यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प उन्हाळ सुरू होऊनही भरलेले आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पामध्ये अद्यापही ७० टक्के जलसाठा आहे. यानंतरही शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे माळपठारावरील (ता. पुसद) ४० गावांसाठी मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्याने या भागातील ६५ हजार नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहे.जिल्ह्याच्या जलायशामध्ये ४३ टक्के पाणीसाठा आहे. आतापर्यंत जलप्रकल्पातील पाण्याच्या मदतीने ४२ हजार ७५० हेक्टरवरील सिंचन पूर्णत्वास गेले आहे. शेवटच्या टोकापर्यंत जाणाऱ्या पाटसऱ्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने हजारो लिटर पाणी यातून वाहून गेले आहे. यामुळे धरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्यानंतरही अपेक्षित सिंचन मात्र अद्यापही झाले नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन दररोज कुठे ना कुठे फुटत आहे. इतकेच नव्हे तर आता तर मुख्य पाईपलाईनही दोन वेळा फुटली आहे. यातून दरदिवसाला दीड कोटी लिटर पाण्याची गळती होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यातून यवतमाळ शहरातील नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.गत चार महिन्यांपासून इसापूर धरणातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. ही योजना सुरू करण्यात यावी म्हणून वारंवार लोकप्रतिनिधींकडे विषय मांडला. योजना मंजूर झाली. अद्यापही कार्यान्वित झाली नाही. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.- जयश्री राठोड,सरपंच, बेलोरागावात गत अनेक महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. श्रीमंत व्यक्ती टँकरने पाणी आणू शकतात. सर्वसामान्यांना विहीर अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी जावे लागते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.- गणेश पठाडे,सरपंच, मारवाडीगतवर्षभरापासून पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. खासगी बोअरवरून नागरिक पाणी भरत आहे. आता बोअरचे पाणीही खाली गेले आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याची स्थिती भीषण होण्याचे चित्र आहे. तत्पूर्वी लोकप्रतिनिधींनी योजना कार्यान्वित करावी.- राजू पारीसकर,पोलीस पाटील, रोहडापूर्ण पावसाळा संपला. मात्र ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाºया विहिरीमध्ये फसलेली मोटर निघाली नाही. संपूर्ण गाव एक किलोमीटरवरून पाणी आणत आहे. वारंवार सूचना केल्या. अजूनही फसलेली मोटर निघाली नाही. इसापूरचे पाणी दूषित झाले आहे. - रमेश मस्के, कुंभारी.

टॅग्स :Chapdoh Damचापडोह धरणNilona Damनिळोणा धरण