बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सतीश साखरकर यांच्या घराला आग लागली. त्यांच्या घरापासून पाहता पाहता आगीने जवळपासची नऊ घरे कवेत घेतली. यात जीवितहानी झाली नाही. मात्र, संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. आग विझविण्यासाठी घाटंजी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
अग्निशमन दल व गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. माहिती मिळताच घाटंजीच्या तहसीलदार पूजा मातोडे, पंचायत समिती सभापती वनिता चव्हाण, मंडळ अधिकारी भाऊ साबळे, तलाठी भाऊ ठाकरे, सचिव मंचरवार, सरपंच अलका देवतळे, पोलीस पाटील संदीप पेंदोर यांनी भेट देऊन पंचनामा केला. गावातील विकास नैताम, मोहन कोटागे, अमोल तारेकर आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.