लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : पहिल्या वर्गातील निरागस प्रदीप संदीप शेळके (७) याच्या निर्घृण खुनाचे गूढ कायम आहे. पोलीस वेगवेगळ्या दिशेने तपास करीत असून परिसरात मात्र गुप्तधनाच्या लालसेतून प्रदीपचा बळी तर गेला नसेल ना, अशी चर्चा आहे. दरम्यान, या घटनेने उमरखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.ढाणकी येथील अनुदानित आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रदीप शेळके याचा मृतदेह शाळेपासून ५०० मीटर अंतरावरील दत्त मंदिर परिसरातील तळ्याजवळ सोमवारी सकाळी आढळून आला. रविवारी दुपारपासून तो बेपत्ता होता. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दगडाने ठेचल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याचा नेमका खून कोणत्या कारणासाठी झाला हे मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही. शाळेपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळला. तो परिसर गुप्तधनासाठी प्रसिद्ध आहे. नेहमी येथे गुप्तधन शोधणारे खड्डे खोदत असतात. त्यातूनच प्रदीपचा खून तर झाला नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.दरम्यान, बिटरगाव पोलिसांनी या प्रकरणी रविवारी उशिरा रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. प्रदीपचे प्रेत उत्तरिय तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल होणार असल्याचे बिटरगावचे पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप यांनी सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या खुनाचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तपासाची दिशा निश्चित होईल. यामागील आरोपी लवकरच गजाआड होतील, असे सांगितले.शंभर रुपये देणारा कोण ?प्रदीप शेळके शनिवारी दुपारी शंभर रुपयांची नोट घेऊन दुकानात गेला होता. त्या दुकानातून त्याने दहा रुपयाचा खाऊ घेतला. ९० रुपये परत आणले होते. त्यानंतर प्रदीप गायब झाला. त्यामुळे प्रदीपला शंभर रुपये देणारा व्यक्ती कोण ? याचाही शोध घेणे गरजेचे आहे.प्रदीपचा भाऊही ढाणकीतच शिकतोउमरखेड तालुक्यातील पार्डी (चुरमुरा) येथील संदीप शेळके यांचे प्रदीप (७ वर्षे) आणि दिलीप (६ वर्षे) नावाचे दोनही मुले ढाणकी येथील आश्रमशाळेतच शिकतात. दोघेही पहिल्याच वर्गात आहे. दिलीप आणि प्रदीप नेहमी एकत्र राहायचे, सोबतच दिसायचे. मात्र रविवारी दिलीप आपल्या वस्तिगृहात झोपलेला होता. त्यामुळे प्रदीप एकटाच होता. याच दरम्यान तो बेपत्ता झाला आणि सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.
निरागस प्रदीपच्या खुनाचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:22 PM
पहिल्या वर्गातील निरागस प्रदीप संदीप शेळके (७) याच्या निर्घृण खुनाचे गूढ कायम आहे.
ठळक मुद्देशोध सुरू : ढाणकी आश्रमशाळा