स्वामिनी : पारवा येथे ४० गावांतील महिला बचत गटाची आमसभा घाटंजी : नवीन दारू दुकानांना कुठल्याही परिस्थितीत गावात येऊ दिले जाणार नाही, असा निर्धार करतानाच १ मे रोजीच्या ग्रामसभेत तसा ठरावही घेतला जाईल, असे पारवा येथे बचत गटाच्या सभेत जाहीर करण्यात आले आहे. पारवा ग्रामपंचायतीत ४० गावातील बचत गटाच्या महिला वार्षिक आमसभेसाठी उपस्थित झाल्या होत्या. या सभेला स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, जिल्हा परिषद सदस्य पावणी कल्यमवार, पंचायत समिती सदस्य सुहास पारवेकर, गटविकास अधिकारी मानकर, स्वामिनीचे घाटंजी तालुका संयोजक मनोज राठोड उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. १ मे रोजीची ग्रामसभा पारदर्शक व्हावी अशी विनंती स्वामिनीतर्फे गटविकास अधिकारी मानकर यांना करण्यात आली. ग्रामसेवकाने खोटा ठराव घेतल्यास परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. संचालन सतीळा नगराळे यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, मंगला कटकोजवार, कल्पना काकडे, संतोष पवार, पार्वता भंडारजवार, जितू मुनेश्वर, सरिता वालकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नवीन दारू दुकानांना ‘नो-एन्ट्री’
By admin | Published: April 30, 2017 1:15 AM