शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ना घर, ना दिवा; बारावीत मात्र घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 11:43 PM

ना रहायला घर... ना उजेडासाठी दिवा... ना घरुन शिकण्यासाठी प्रेरणा, अशा परिस्थितीत दररोज सहा किलोमीटर मानव विकास मिशनच्या बसने येजा करून एका पारधी बेड्यावरील विद्यार्थिनीनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले.

ठळक मुद्देशिक्षणाची जिद्द : अंबाडी पारधी बेड्यावरील आरतीचे यश

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : ना रहायला घर... ना उजेडासाठी दिवा... ना घरुन शिकण्यासाठी प्रेरणा, अशा परिस्थितीत दररोज सहा किलोमीटर मानव विकास मिशनच्या बसने येजा करून एका पारधी बेड्यावरील विद्यार्थिनीनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. आरती राजाबाबू राठोड असे या जिद्दी विद्यार्थिनीचे नाव असून तिने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ६१.३८ टक्के गुण मिळविले आहे.किनवट शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अंबाडी तांडा आहे. तेथे आरती राठोड हिचे पाल वजा घर आहे. पारधी घरकुल योजनेत आईच्या नावाने घरकूल मिळाले. आई-वडील उदरनिर्वाहसाठी सदैव भटकंतीलाच. वन विभागाच्या जाचक अटीमुळे परंपरागत शिकारीचा व्यवसायही बंद. त्यामुळे गावोगावी फुगे विकून जीवन जगणे हाच या परिवाराचा व्यवसाय. अशा अवस्थेत गावातीलच जिल्हा परिषद शाळेत आरती शिकू लागली. विदर्भातील अनसिंग येथे तिने दुसरी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तेलंगणातील आदिलाबाद येथे आठवी आणि महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी येथे नववीपासून शिक्षण घेतले.दहावीच्या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळविले होते. ४८.६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारी ती या परिसरातील पारधी समाजातील एकमेव विद्यार्थिनी होती. परंतु तिच्याकडे कोणतेही जात प्रमाणपत्र नसल्याने शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळाला नाही. वसतिगृहातही प्रवेश मिळाला नाही. अशा बिकट परिस्थितीत तिने दररोज मानव विकासच्या बसने ये-जा करून बारावीची परीक्षा दिली. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर ती ६१.३८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत तिची टक्केवारी कमी असली तरी तिच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास ती मेरिटच आहे.दहाव्या वर्गात आरती पास झाली. तेव्हा शिवसेनेचे युवा नेते सचिन नाईक यांनी धो-धो पावसात तिचे घर गाठले. तिचे अभिनंदन करून दहा हजार रुपयांची मदत केली होती. अशाच प्रकारे सामाजिक संस्था, दाते व शासन स्तरावरून आरतीला सुविधा मिळाल्यास ती शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव उज्वल केल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :educationशैक्षणिक