शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

तब्बल ६० वर्षांपासून रस्ताच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 9:55 PM

शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणताही पर्याय नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : गौळपेंड गावासाठी ‘शकुंतला’ ठरली शाप

मुकेश इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शकुंतला गोरगरिबांची लाईफलाईन. स्वस्त प्रवासाचे मस्त माध्यम. मात्र हीच शकुंतला आता दारव्हा तालुक्याच्या गौळपेंडच्या नागरिकांसाठी अभिशाप ठरत आहे. या गावाच्या वेशीवर असलेल्या पुलाने ६० वर्षांपासून अजस्त्र भिंत तयार केली. रेल्वेच्या किचकट नियमांमुळे कोणताही पर्याय नाही. वाहतुकीची सर्व साधने या पुलाजवळच खोळंबतात. गावात जायला गाडी बैलाशिवाय पर्याय नसतो. हा मन:स्ताप गेल्या सहा दशकांपासून नागरिक सहन करीत आहे.दारव्हा तालुक्यातील गौळपेंड हे ८०० लोकवस्तीचे पुनर्वसित गाव. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील शेलोडीच्या उत्तरेस १९५९ मध्ये गाव वसले. या गावाच्या वेशीवरूनच यवतमाळ-मूर्तीजापूर शकुंतला धावते. गावाजवळच्या नाल्यावर ब्रिटीशांनी त्या काळी पूल बांधला. आता या पुलाखालचा नालाच गावकऱ्यांसाठी रस्ता झाला आहे. सुरुवातीला वाहतुकीची साधने तेवढी नव्हती. त्यामुळे या पुलाखालून गावाचे सर्व व्यवहार होत होते. परंतु आधुनिकीकरणाचे वारे वाहताना वेगवान आणि मोठी वाहने आली. परंतु यापैकी कोणतेही मोठे वाहन गौळपेंडमध्ये जाऊच शकत नाही. शकुंतलेचा हा पूल इतका छोटा आहे की बैलगाडी आणि छोटी चारचाकी वाहनेच जाऊ शकतात. सध्या शेतीचे यांत्रिकीकरण होत आहे. प्रत्येक जण बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करतात. परंतु गावात ही वाहने पोहोचतच नाही. गावातील शेतमाल विकायचा असेल तर पुलाच्या दुसºया बाजूपर्यंत बैलगाडीने अथवा डोक्यावरच माल न्यावा लागतो.बोदेगाव साखर कारखाना सुरू असताना या गावात उसाची लागवड झाली. परंतु ट्रक गावापर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे बैलगाडीतूनच ऊस न्यावा लागला. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.लग्न असो वा इतर कोणताही प्रसंग वाहन आले की, पुलाजवळच थांबते. पुलापासून पायदळ येण्याशिवाय पर्याय नसतो. जणू या पुलाने वाहनांना प्रवेश बंदीच केली आहे. पावसाळ्यात तर या पुलाखालून धो-धो पाणी वाहते. दुचाकी चालविणेही कठीण होते. विद्यार्थ्यांना शाळेत जातानाही मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. हा पूल जणू यातना देत आहे.रेल्वेच्या नियमांपुढे सर्वच हतबलरेल्वेचे नियम अतिशय कडक आहे. या पुलाच्या आसपास कोणतेही काम केल्यास रेल्वे ते काढून टाकते. यासाठी नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी यांनी यासाठी प्रयत्न केले. परंतु अद्यापपर्यंत यश आले नाही. संपूर्ण गावात डांबरीकरण, काँक्रीटीकरण झाले. परंतु या पुलाखाली व आजूबाजूचा परिसर मात्र आहे तसाच आहे.

टॅग्स :railwayरेल्वे