शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

कथा नही, जीवन की व्यथा सुनाने आया हूं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:22 PM

समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली.

ठळक मुद्देसंस्मरणीय संदेश : यवतमाळकरांच्या मनात ठसले मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे ‘कडवे वचन’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मै कथा नही,जीवन की व्यथा सुनाने आया हूं...अर्थी उठाने से पहले,जीवन का अर्थ समझ लेनावर्ना बडा अनर्थ हो जायेगा...समाजातल्या दांभिकतेवर कडवट प्रहार करणाऱ्या मुनिश्री तरुणसागरजी महाराजांचे हे शब्द आजही यवतमाळकरांच्या मनात ठसले आहेत. या विश्वविख्यात राष्ट्रसंताचे नवी दिल्लीत निधन झाले, अन् यवतमाळवासीयांच्या मनात कालवाकालव सुरू झाली. ९ वर्षांपूर्वी यवतमाळात मुनिश्रींचा पदस्पर्श झाला होता. त्यावेळी लाखो लोकांनी त्यांचे ‘कडवे वचन’ कानात प्राण आणून ऐकले आणि काळजात जपून ठेवले. त्यांच्या निर्वाणाचे वृत्त ऐकून अनेकांच्या मनात पोरकेपणा दाटला.२००९ हे ते वर्ष होते. जेव्हा क्रांतिकारी राष्ट्रसंत मुनिश्री तरुणसागरजी महाराज पहिल्यांदाच यवतमाळनगरीत आले होते. श्रीमती वीणादेवी जवाहरलालजी दर्डा परिवार आणि जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने मुनिश्रीजींच्या ‘कडवे प्रवचन’ या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनासाठी श्वेतांबर, दिगंबर, मंदिर मार्गी, जैन समाजातील इतर सर्व पंथांनी एकत्र येऊन श्री सकल जैन समाज यवतमाळची स्थापना केली होती. सकल जैन समाजाच्या छत्राखाली हे आयोजन केले होते. तेव्हा खऱ्या अर्थाने एकत्रित जैन समुदाय इतिहास घडवू शकतो, हे अपार गर्दीच्या आयोजनातील शिस्तबद्धता आणि भव्यदिव्यतेने सिद्ध केले. विशेष म्हणजे, एकत्रित जैन समाज इतर सर्व समाजाला सोबत घेऊन मोठ्यात मोठे आयोजन नक्कीच करू शकतो व ही काळाची गरज आहे, याबाबत मुनिश्रीजींनीही मार्गदर्शन केले होते.७ ते १२ एप्रिलपर्यंत चाललेली ही प्रवचनमाला अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली होती.जीवन भी एक क्रिकेट हैसृष्टी के महान स्टेडियम मेधरती के विराट पिचपरसमय बॉलिंग कर रहा हैंशरीर बल्लेबाज हैंपरमात्मा के इस आयोजन मेअंपायर धर्मराज हैंप्राण हमारा विकेट हैंजीवन भी एक क्रिकेट हैंअशा काव्यात्मक शैलीत मुनिश्रीजींनी यवतमाळकरांचे हृदय जिंकले होते. जनसामान्यांना समजणाऱ्या सुगम भाषेत त्यांनी जीवनाचा गर्भित सार मांडला होता. ‘सासों के सीमित ओव्हर मे सर्जन के रन बनाने हैं’ हा त्यांचा संदेश अनेकांचे मतपरिवर्तन घडवून गेला. अशा या क्रांतिकारी राष्ट्रसंतांच्या निधनाने यवतमाळकर हळवे झाले आहेत.मुनिश्री म्हणाले होते, ‘ऐतिहासिक’ आयोजनआयोजन आयोजन समितीचे अध्यक्ष तत्कालीन खासदार विजय दर्डा, कार्याध्यक्ष किशोर दर्डा, स्वगताध्यक्ष अरुणभाई पोबारू, महामंत्री सुभाष जैन, उपाध्यक्ष महेंद्र सुराणा, प्रकाश चोपडा, मोहन गांधी, नरेश लुणावत, अशोक जैन, राजेंद्र गांधी, राजू जैन, विनोद छेडा, लहरभाई नागडा, सुभाषचंद आचलिया, नंदकुमार बदनोरे, चंद्रकांत देसाई, सचिव प्रवीण बोरा, विजय लुणावत, खंतीबाई दोशी, परेश लाठीवाला, समन्वय सचिव प्रसन्न दफ्तरी, डॉ. शेखर बंड, डॉ. रमेश खिंवसरा, नंदकुमार इंगोले यांच्यासह अनेकांनी आयोजनासाठी दररोज बैठका घेतल्या. प्रत्येक कामाचे काटेकोर नियोजन केले जात होते. खुद्द मुनिश्री तरुणसागरजी महाराजांनीही यवतमाळच्या प्रवचनमालेचा ‘ऐतिहासिक’ असा उल्लेख केला होता, हे विशेष.

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरVijay Dardaविजय दर्डा