शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

गिट्टीक्रशरला ‘एनओसी’ने शेतकºयांची आत्मदहनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 9:47 PM

शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ....

ठळक मुद्दे‘ऊर्जाटेक’वर वाटखेड ग्रामपंचायत मेहरबान : धुरामुळे पिके खराब होतात, शेतीचा पोत बिघडतो, आरोग्य धोक्यात

के.एस. वर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शेतातील पिके खराब होतात, जमिनीचा पोत बिघडतो, आरोग्यास धोका निर्माण होतो, त्यामुळे गिट्टीक्रशरला परवानगी देऊ नका, ही वाटखेड येथील नागरिकांची विनंती ग्रामपंचायतीने ठोकरली. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांपर्यंत प्रकरण पोहोचूनही परवानगी रद्द केली नाही. अखेर या गावातील आठ नागरिकांनी आत्मदहनाची नोटीस प्रशासनाला दिली आहे.वाटखेड ग्रामपंचायतीने ऊर्जाटेक कंपनीच्या गिट्टीक्रशरला गतवर्षी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. भविष्यातील धोके लक्षात घेता गावकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तत्कालीन जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने एनओसी रद्द केली होती. त्यानंतरचे दोन-तीन प्रयत्नही अयशस्वी झाले. यावर्षी ऊर्जाटेक कंपनीने पुन्हा जिल्हाधिकारीºयाकडे अर्ज केला. १५ आॅगस्ट रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत प्रस्ताव पारित झाला. त्याविरूद्ध शेतकºयांनी पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे न्यायाची मागणी केली आहे.२६ जानेवारी २०१६ ला झालेल्या ग्रामसभेतही ठराव पारित करण्यात आला होता. चौकशीत कोरम पूर्ण नसल्याने ग्रामसभा अवैध ठरली होती आणि जिल्हाधिकाºयांनी एनओसी रद्द केली होती. ८८० मतदार असलेल्या वाटखेडा ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत १५ आॅगस्ट १७ ला १५२ सदस्य हजर होते. ४२ समर्थन, ११ विरोधात तर, १९९ तटस्थ राहिले होते. गिट्टीक्रशरला प्रचंड विरोध असतानाही एनओसी देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नामुळे नागरिकांत रोष आहे.पीडित शेतकºयांनी नोंदविल्या तीव्र भावनाआमच्या शेतातील कापूस गिट्टीक्रशरच्या धुरामुळे आणि ये-जा करणाºया वाहनांच्या धुरामुळे दरवर्षी काळा पडतो. पºहाटी फुलावर येत नाही. तुर-सोयाबीनचा दाणा काळवंडतो, उत्पादन कमी होते. शेतमालाची प्रत बिघडल्याने नुकसान होत आहे.- शांताबाई बावनेसन ११ ते १५ या चार वर्षाच्या काळात या गिट्टीक्रशरमुळे शेतकºयांचे बरेच नुकसान झाले आहे. त्याची प्रथम भरपाई देण्यात यावी. यापूर्वी शेतकºयांचे व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याच अटीवर ग्रामपंचायतीने एनओसी दिली होती.- श्रावण वाकडेगिट्टीक्रशरकडून दोनही बाजूस जाणारा मार्ग पक्का बांधून दिल्यास नुकसान होणार नाही.- माधव बावनेसरपंचांचाही परवानगीला विरोधशेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.गिट्टीअभावी कालव्याची कामे बंदबेंबळा कालव्याच्या बांधकामाकरिता नागपूरच्या ऊर्जाटेक कंपनीने हा गिट्टीक्रशर उभारला आहे. चार वर्षे त्यामुळे उत्पादन करता आले. दोन वर्षापासून एनओसी न मिळाल्याने प्रकल्प बंद आहे व बेंबळा प्रकल्पाला गिट्टी चुरी पुरविता न आल्याने कॅनलची कामेही थांबली आहे, असे ऊर्जाटेकचे व्यवस्थापक शर्मा यांनी सांगितले.सरपंचांचाही परवानगीला विरोधशेतकºयांच्या विरोधात घेतलेल्या ठरावाला विरोध आहे. ग्रामसभेत आमिषे दाखवून काही लोक आणण्यात आली. या ग्रामसभेवर दबाव आणला गेला आहे. या ठरावावर सही करणार नाही आणि एनओसी देणार नाही, असे वाटखेडच्या सरपंच सुनंदा आत्राम यांनी सांगितले. आपण नागरिकांसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.