जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : जिल्ह्यातील ५५ गट व ११० गणांची निवडणूक यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि ११० गणांसाठीच निवडणूक होत असून सुटीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्विकारले जतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे १२ गण, या निडणुकीतून वगळण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, त्यांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून आवश्यकतेनुसार एक हजार ९२१ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल. अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या ३ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४८ मतदान केंद्र असल्याचेही सिंग यांनी सांगितले. जिल्ह्यात ३२ हजार ९९९ पदवीधर मतदार असून १५९ मतदान यंत्र लागणार आहे. केंद्रांवर ५३ केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी मतदारांना त्या दिवशी नैमत्तिक रजा दिली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
सुटीच्या दिवशीही स्वीकारणार नामांकन
By admin | Published: January 28, 2017 2:19 AM