शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आता आले आहे ‘एसटी’चे चिल्लरमुक्त स्मार्ट कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:35 PM

‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ योजना सादर करून ‘एसटी’ने वाहक आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या वाद-विवादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठळक मुद्देआॅनलाईनची सोय वाहक-प्रवाशांमधील तोंडातोंडी थांबणार

विलास गावंडे ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : सकाळी ६ वाजता सुटणाऱ्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशाने २६ रुपयांच्या तिकीटासाठी ५०० रुपयांची नोट टिकविली अन् वाहकाचे माथे ठणकले. तोंडातोंडी सुरू होऊन प्रवाशाने जबाबदारीचे भान ठेवण्याची जाणीव वाहकाला करून दिली. अखेर शिल्लक राहिलेली रक्कम तिकीटाच्या मागे लिहून देण्यावर समझोता होऊन पुढील प्रवास सुरू, असा लोकवाहिनीचा अनुभव. मात्र येणाऱ्या मे महिन्यापासून ‘एसटी’तला हा गोंधळ थांबणार आहे. ‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ योजना सादर करून ‘एसटी’ने वाहक आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या वाद-विवादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पहिली फेरी घेऊन जाणाऱ्या वाहकाच्या हाती सुटे देण्यासाठी ‘एसटी’ १०० रुपये टिकविते. दहाच्या दहा नोटा असतात. सध्या ५०० रुपयांच्या नोटेची चलती आहे. बहुतांश प्रवासी २५-३० रुपयांच्या तिकीटासाठी एवढी मोठी नोट हाती ठेवतो, तेव्हा वाहकाच्या डोक्यावर आट्या पडते. अन् तेथूनच सुरू होते हमरी-तुमरी आणि अनावश्यक वाद-विवाद. दीर्घ कालावधीनंतर का होईना यावर उपाय शोधण्यात आला आहे. ‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ या नावाने सुरू केलेल्या योजनेतून प्रवाशांसह वाहकांचीही सोय केली जात आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या योजनेची घोषणा केली.सुरुवातीला ५० रुपयांचे स्मार्ट कार्ड घ्यायचे. पहिल्यांदा वापर करण्यासाठी ५०० रुपये भरायचे. ही रक्कम संपल्यानंतर किमान १०० रुपयांचा भरणा करून पुढील प्रवासासाठी मोकळे. १ मे महाराष्ट्र दिनापासून याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. प्रत्येक आगारातून स्मार्ट कार्ड मिळणार आहे. विशेष म्हणजे ‘अहस्तांतरनिय’ची सक्ती नाही. कुणीही काढा आणि कुणीही वापरा, ही सुविधा मिळणार आहे. जितका प्रवास केला तितकी रक्कम कार्डमधून वजा होत राहील. कुटुंबातील सदस्य, मित्र आणि इतर कुणीही काढलेले कार्ड वापरून प्रवासाची सोय या कार्डाद्वारे होणार आहे.लाल डबा ते शिवशाहीतही वापरालालडबा, रातराणी, हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध या कुठल्याही बसमध्ये हे कार्ड चालणार आहे. घरबसल्यादेखील आॅनलाईन रक्कम या कार्डवर भरणा केली जाऊ शकते. या कार्डमुळे प्रवास सुखकर होईल, अशी महामंडळाला आशा आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा