लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणतेही नवे दुचाकी वाहन खरेदी केल्यास यापुढे त्यासोबत दोन हेल्मेट दिले जाणार आहे. परिवहन आयुक्तालयाने वाहन विक्रेत्यांना या संबंधीची सक्ती केली आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे.अपर परिवहन आयुक्त यांच्या सूचनेवरुन परिवहन उपायुक्त (१) मुंबई यांनी १० जानेवारी रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहे. दुचाकी वाहन चालकात शिकाऊ वाहन परवाना देताना त्यांच्याकडून हेल्मेट वापराबाबतचे बंधपत्र (बॉन्ड) घेतला जातो. हा बॉन्ड नसेल तर वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना दिला जात नाही. हेल्मेटबाबत न्यायालयाच्या आदेशाची व कायद्यातील तरतुदींची पूर्ण पूर्तता होत नसल्याची बाब परिवहन आयुक्तालयाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळेच याबाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व आरटीओ आणि डेप्युटी आरटीओंना जारी करण्यात आले आहे. त्यानुसार दुचाकी वाहन उत्पादकांच्या सर्व विक्रेत्यांना दुचाकी वाहन विकते वेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याचे निर्देश आहेत. वाहन नोंदणीच्या वेळी कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रात दुचाकीसोबत दोन हेल्मेट पुरविल्याबाबतचा उल्लेख नमूद असल्याची खातरजमा करण्याच्याही सूचना आहेत. उपरोक्त आदेशाची काटेकोर व त्वरित प्रभावाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वाहन विक्रेत्यांकडून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर केंद्रीय मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम १३८ मधील उपनियम ४ (एफ) अन्वये कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.राज्यभरातून तक्रारीनव्या वाहन खरेदीदारांना दोन हेल्मेटची सक्ती असताना वितरकाकडून त्याची अंमलबजावणी राज्यभरात केली जात नसल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्तालयाला प्राप्त झाल्या आहेत. माहिती अधिकारातही तशी विचारणा केली गेली आहे. त्यामुळेच नव्या वाहनासोबत दोन हेल्मेट पुरविण्याची सक्ती वाहन विक्रेत्यांना करण्यात आली आहे.
राज्यात आता नव्या वाहनासोबत दोन हेल्मेट देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 4:09 PM
कोणतेही नवे दुचाकी वाहन खरेदी केल्यास यापुढे त्यासोबत दोन हेल्मेट दिले जाणार आहे. परिवहन आयुक्तालयाने वाहन विक्रेत्यांना या संबंधीची सक्ती केली आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे.
ठळक मुद्देविक्रेत्यांना सक्ती काटेकोर अंमलबजावणीचे परिवहन आयुक्तांचे आदेश