राजनंदनी भागवत : सरपंच संघटनेच्यावतीने सत्कार दिग्रस : तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय आहे. कोणतेही कामे प्रलंबित ठेवल्या जाणार नाही. तत्काळ प्रकरणे निकाली काढल्या जाईल. सर्वसामान्यांचे कुठलेही काम थांबणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गावात ग्रामसभेमध्ये होणारा त्रास टाळण्यासाठी चित्रीकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी राजनंदनी भागवत यांनी केले.दिग्रस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजनंदनी भागवत आणि सहायक गटविकास अधिकारी अमित राठोड रुजू झाले आहेत. त्यांचा सरपंच संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य डॉ.विष्णू उकंडे होते. सरपंच अतिशय महत्त्वाचे पद असून समाजसेवा करण्याची ही एक मोठी संधी आहे. या पाच वर्षात असे काय करा की ते पुढील ५० वर्षापर्यंत तुमचे नाव घेतले जाईल, असे डॉ.उंकडे यांनी सांगितले. यावेळी सुभाष काटेकर, ढोले, सरपंच संघटना अध्यक्ष पंकज चव्हाण, उपाध्यक्ष नितीन इंगोले, लता काटेकर, विनोद जाधव, धावजी पवार, जयसिंग जाधव, मुजमुले, प्रवीण चव्हाण, बालाजी ठाकरे, मजहर हुसेन यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते. संचालन धावजी पवार, तर आभार नितीन इंगोले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
ग्रामसभेचे आता चित्रीकरण करणार
By admin | Published: September 15, 2016 1:26 AM